इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:20 AM2018-03-25T00:20:14+5:302018-03-25T00:20:14+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करून सभेला पूर्णविराम देण्यात आला.

 Pausing the pre-ward meeting with the approval of the act | इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम

इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम

Next

इंदिरानगर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करून सभेला पूर्णविराम देण्यात आला. पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रभाग ३० मधील पांडवनगरी, कलानगर व राजीवनगरसह परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्र ार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी  केली. गेल्या पंचवार्षिक मध्येही पाणीप्रश्नाची समस्या होती. प्रत्येक सभेत पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही प्रश्न सुटत नाही, अशी तक्र ार सतीश सोनवणे यांना केली. मनपाची तक्र ार करण्यासाठी असलेल्या अ‍ॅपमध्ये श्रद्धा रो-हाउस कॉर्नरला असलेली जुनी व पडिक विहिरीची तक्र ार केली असता काही दिवसांतच संबंधित विहीर बुजवण्यात आल्याची खोटी माहिती दिल्याची तक्र ार अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली. अ‍ॅपवरच नगरसेवकांनाच खोटी माहिती दिली जात असेल तर इतर नागरिकांचे काय, असा सवालही त्यांनी केला. परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित ठेकेदाराला संपर्क केला असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याची तक्र ारही बडोदे यांनी केली. सह्याद्री हॉस्पिटल ते काठेगल्ली सिग्नल या रस्त्यावर हातगाड्यांचे अतिक्र मण वाढत असल्याची तक्र ार अर्चना थोरात यांनी केली. प्रभाग २३ मधील सावरकर उद्यानांमधील खेळणी तुटलेल्या असून, लहान मुले खेळत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्या तातडीने काढून घ्यावी, अशी मागणी अजिंक्य साने यांनी केली. टाकळी येथील शौचालयाचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याची तक्र ार सुषमा पगारे यांनी केली. या चर्चेनंतर सभा आटोपती घेण्यात आली.
मुकणेसंबंधी विधानाचे पडसाद
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर मुकणे धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरजच नव्हती, असे विधान केले होते. त्याचे पडसाद प्रभाग सभेत उमटले. यावेळी सत्ताधारी भाजपाचे सतीश सोनवणे यांनी सांगितले, मुकणे धरणातून पाणीयोजनेची गरज नसल्याचे सांगणाºया आयुक्तांनी प्रभाग ३० मधील पाणीप्रश्न किती गंभीर आहे हे बघावे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुकणे धरणाची निर्मिती करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Web Title:  Pausing the pre-ward meeting with the approval of the act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.