दहा शेतकºयांना पावणेदोन लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:41 AM2017-08-10T00:41:48+5:302017-08-10T00:41:54+5:30
कृषी समितीच्या बैठकीत निर्णय नाशिक : जिल्ह्यातील दहा जळीतग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाºया मदतीच्या अनुषंगाने पावणेदोन लाखाची मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नयना गावित यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक झाली.
कृषी समितीच्या बैठकीत निर्णय
नाशिक : जिल्ह्यातील दहा जळीतग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाºया मदतीच्या अनुषंगाने पावणेदोन लाखाची मदत मंजूर करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नयना गावित यांच्या उपस्थितीत कृषी समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत कृषी विभागातील योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात जळीतग्रस्त शेतकºयांना मदत करण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
त्यानुसार जिल्ह्यातील दहा शेतकºयांना नुकसानीच्या प्रमाणात मदत करण्यास मान्यता देण्यात आली. त्यात शंकर ठाकरे (दुगाव- चांदवड) २५ हजार रुपये, विलास सोनवणे (दुगाव- चांदवड) १० हजार रुपये, आनंदा सोनवणे (दुगाव- चांदवड) १४ हजार रुपये, प्रकाश सोनवणे (दुगाव- चांदवड) १० हजार रुपये, खंडू चव्हाण (नांदूर-येवला) १२,५००
हजार रुपये, आप्पा रोठे (भुलेराव- येवला) २५ हजार रुपये, धोंडू डावरे (कोनांबे- सिन्नर) १६ हजार ७०० रुपये, यशवंत चौरे (मोहाडागळी- बागलाण) १२ हजार २५० रुपये, सूर्यभान मोहन (नांदूर- येवला) ७५०० रुपये, काळू गवळी
(अंतापूर- बागलाण) २५ हजार रुपये अशी एकूण पावणे दोन लाख रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शेतकरी लाभार्थींना त्वरित रोख रक्कम अदा करावी. तसेच तालुका स्तरावरून रोख रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी, अशी सभापती नयना गावित यांनी सूचना केली. या बैठकीस सदस्य महेंद्रकुमार काले, नीलेश केदार, बलबीर कौर गिल, आशाताई साळवे, एकनाथ गायकवाड, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.