एकास अटक : पावणे सात लाखांचा गुटखा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:12 PM2020-12-17T17:12:16+5:302020-12-17T17:12:36+5:30

पथकाने ब्राम्हणकर यांच्या गोडावूनवर छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला आणि सुगंधी सुपारीचा तब्बल ६ लाख ७० हजार ०९७ रूपये किमतीचा साठा मिळून आला. पथकाने संशयीतास पोलासांच्या स्वाधिन केले

Pavane seized gutka worth Rs 7 lakh | एकास अटक : पावणे सात लाखांचा गुटखा हस्तगत

एकास अटक : पावणे सात लाखांचा गुटखा हस्तगत

Next
ठळक मुद्दे'एफडीए'च्या पथकाचा गुदामावर छापा

नाशिक : राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला सुगंधी पानमसाला, तंबाखुजन्य पदार्थांची चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या हेतूने मोठा साठा पेठरोड येथे दडवून ठेवल्याची गोपनीय माहिती अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. यानुसार पथकाने येथील एका गुदामात छापा टाकून सुमारे पावणे सात लाख रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोडवरील एका गोडावूनमधून किरकोळ विक्रेत्यांना गुटखा पुरविला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१३) हा छापा टाकण्यात आला. यावेळी रवी ब्राम्हणकर (रा.कॅनलरोड, पेठरोड) यास अटक करण्यास पोलिसांना यश आले. मात्र त्यास गुटख्याचा माल पुरविणारा वैभव मोराडे हा पसार झाला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदिप शिवाजी देवरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पथकाने ब्राम्हणकर यांच्या गोडावूनवर छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला आणि सुगंधी सुपारीचा तब्बल ६ लाख ७० हजार ०९७ रूपये किमतीचा साठा मिळून आला. पथकाने संशयीतास पोलासांच्या स्वाधिन केले असून पोलीस तपासात वैभव मोराडे हा पुरवठादार असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी गोडावून मालकासह पुरवठादाराविरूध्द अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.
...

Web Title: Pavane seized gutka worth Rs 7 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.