पवन एक्सप्रेस दुर्घटना : दहा गाड्यांचा मार्ग बदलला, तपोवन, विदर्भ एक्सप्रेस ‘शॉर्ट टर्मिनेट’, अकरा गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 08:02 PM2022-04-03T20:02:42+5:302022-04-03T20:02:57+5:30

पंचवटी, राज्यराणी, नंदीग्रामसह अकरा गाड्या रद्द

Pawan Express Accident Ten Trains route Changed Tapovan Vidarbha Express Short Terminate Eleven Trains Canceled | पवन एक्सप्रेस दुर्घटना : दहा गाड्यांचा मार्ग बदलला, तपोवन, विदर्भ एक्सप्रेस ‘शॉर्ट टर्मिनेट’, अकरा गाड्या रद्द

पवन एक्सप्रेस दुर्घटना : दहा गाड्यांचा मार्ग बदलला, तपोवन, विदर्भ एक्सप्रेस ‘शॉर्ट टर्मिनेट’, अकरा गाड्या रद्द

Next

नाशिक : देवळाली कॅम्प ते घोटी दरम्यान लोहशिंगवे गावजवळ मुंबईकडून बिहारच्या जयनगरला जाणाऱ्या लोकमान्य टिळक जयनगर गाडीचे (पवन एक्सप्रेस) दहा ते बारा डबे रुळावरून घसरले. रविवारी (दि.३) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेकडून अकरा गाड्या रद्द करण्यात आल्या तर दहा रेल्वेगाड्यांचा मार्ग अपात्कालिन स्थितीत बदलण्यात आला आहे.

पवन एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे मुंबईहुन सुटणारी देवगिरी एक्सप्रेस, हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस, पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच हावडा दुरांतो एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतानपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, पंजाब मेल, पटना-जनता एक्सप्रेस, सेवाग्राम या सर्व गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच पंचवटी एक्सप्रेस (१२१०९/१०), नंदीग्राम (११४०१), हुजुरसाहिब नांदेड राज्यराणी (१७६११/१२), पुरी सुपरफास्ट (१२१४५/४६), अमरावती सुपरफास्ट (१२१११), मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (१२११२), अजमेर शताब्दी एक्सप्रेस (१२०१५), देवगिरी एक्सप्रेस (१७०५७) या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस (१२०१६), देवगिरी एक्सप्रेस (१७५८), नंदीग्राम (११४०२), तपोवन एक्सप्रेस (१७६१८) या चार रेल्वेगाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच (शॉर्ट टर्मिनेट) थांबला आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, ठाणे, इगतपुरी जंक्शन, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ या सर्व रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून अपात्कालिन चौकशी व मदत केंद्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवरुन प्रवाशांना विविध मार्गावरील रेल्वेगाड्या व दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या रेल्वेगाड्या व त्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात करण्यात आलेले बदलांविषयीची माहिती दिली जात आहे.

Web Title: Pawan Express Accident Ten Trains route Changed Tapovan Vidarbha Express Short Terminate Eleven Trains Canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.