जिल्ह्याच्या राजकारणावर पवार कुटुंबीयांचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:06+5:302021-07-08T04:12:06+5:30
स्व. ए. टी. पवार यांनी कळवण, सुरगाणा व पेठ या तालुक्यांचे जवळपास ४० वर्षे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या ...
स्व. ए. टी. पवार यांनी कळवण, सुरगाणा व पेठ या तालुक्यांचे जवळपास ४० वर्षे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या कारकिर्दीतच पुत्र नितीन व धाकटी सून डॉ. भारती पवार यांनी सन २०१२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून त्यात दोन्हीही विजयी झाले. सन २०१७ मध्ये पुन्हा हे दोन्हीही जिल्हा परिषदेत निवडून आले. सन २०१९ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. भारती पवार या खासदार झाल्या, तर त्यापाठोपाठ नितीन पवार यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला. दीड वर्षापूर्वी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मानूर गटाच्या पोटनिवडणुकीत स्व. ए. टी. पवार यांची कन्या गीतांजली पवार-गोळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे डॉ. भारती पवार यांच्या कुटुंबातील जेठ आमदार व नणंद जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आता स्वत: डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्री झाल्याने पवार कुटुंबीयांचा दबदबा थेट देशपातळीपर्यंत निर्माण झाल्याचे मानले जात आहे.