ठाकरे स्टेडियममध्ये भुजबळ सिटीच्या कोविड सेंटरचे पवारांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:20+5:302021-04-19T04:13:20+5:30

नाशिक : कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणाऱ्या अभिनव ऑक्सिजन बेडस्‌ची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर ...

Pawar inaugurates Kovid Center in Bhujbal City at Thackeray Stadium | ठाकरे स्टेडियममध्ये भुजबळ सिटीच्या कोविड सेंटरचे पवारांच्या हस्ते उद्घाटन

ठाकरे स्टेडियममध्ये भुजबळ सिटीच्या कोविड सेंटरचे पवारांच्या हस्ते उद्घाटन

Next

नाशिक : कोरोनाच्या संकटात संकटग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी त्यांना आधार देणाऱ्या अभिनव ऑक्सिजन बेडस्‌ची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थांना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

विभागीय क्रीडा संकुलाच्या ठाकरे स्टेडियममध्ये मेट भुजबळ नॉलेज सिटी व महानगरपालिका, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या सहकार्याने विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी, अशा एकूण ३९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन स्वरूपात पार पडले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेले कोविड सेंटर विलगीकरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र, भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये ऑक्सिजन बेडस्‌ची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बेडची संख्या कमी पडत असल्याने या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था

या कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाइनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक आहेत, तसेच सर्व रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला असून, ५० एअर कूलर बसविण्यात आलेले आहेत.

इन्फो

तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांची सेवा

या कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून सर्जन डॉ. अभिनंदन जाधव यांच्यासह ६ एमबीबीएस व ४ बीएचएमएस, असे ११ डॉक्टर, तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक ॲडमिन, तीन फार्मसी ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

इन्फो

नागरिकांसाठी सुविधा

याठिकाणी रुग्णांना औषध उपचारांसह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दूध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचसोबत रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इ. खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यासह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Pawar inaugurates Kovid Center in Bhujbal City at Thackeray Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.