मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:56 AM2019-06-15T00:56:46+5:302019-06-15T00:57:21+5:30
नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी येवल्याचे संभाजी पवार तर, व्हाइस चेअरमनपदी शशीकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या चेअरमनपदी येवल्याचे संभाजी पवार तर, व्हाइस चेअरमनपदी शशीकांत आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा मजूर संघाचे तत्कालीन चेअरमन हरिभाऊ वाघ व व्हाइस चेअरमन आशा चव्हाण यांनी राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी शुक्रवारी संघाच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत चेअरमनपदासाठी संभाजी पवार यांच्या नावाची सूचना संचालक शिवाजी रौंदळ यांनी, तर त्यास सतीश सोमवंशी यांनी अनुमोदन दिले. व्हाइस चेअरमनपदासाठी शशीकांत आव्हाड यांची सूचना शशीकांत उबाळे यांनी, तर त्यास सुरेश भोये यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदासाठी प्रत्येक एकच अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी सौंदाणे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील मजूर संस्थांच्या हितासाठी व संवर्धनासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पवार व आव्हाड यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, योगेश हिरे, हरिभाऊ वाघ, शिवाजी कासव, जगन्नाथ वाजे, चिंतामण गावित, प्रमोद मुळाणे, योगेश गोलाईत, विठ्ठलराव वाजे, आशा चव्हाण आदी उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर पवार व आव्हाड समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
येवल्यात समर्थकांचा जल्लोष
चेअरमनपदी संभाजी पवार यांची निवड झाल्याचे वृत्त येवल्यात धडकताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यापूर्वीदेखील पवार यांनी नाशिक जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या संघाचे अध्यक्षपद भूषिवले आहे. पवार यांचे येवल्यात शुक्र वारी सायंकाळी ५ वाजता येवला-विंचूर चौफुलीवर आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनौपचारिक सभा झाली. यावेळी आमदार किशोर दराडे यांनी पवार यांचा सत्कार केला. यावेळी रतन बोरनारे, आबा कदम, दिलीप मेंगळ, विठ्ठल आठशेरे, प्रमोद सस्कर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांची भाषणे झाली. यावेळी अरु ण काळे, पुंडलिक पाचपुते, रवि काळे, प्रवीण गायकवाड, मनोहर जावळे, बाळासाहेब पिंपरकर, आप्पा खैरनार, मंगेश भगत, पी. के. काळे, शरद लहरे, कैलास घोरपडे आदिंसह सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.