पावणेदोन लाखांचा कांदा लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:04 AM2019-08-12T01:04:24+5:302019-08-12T01:05:26+5:30

द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरलेल्या २३७ गोण्या लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pawedon plundered millions of onions | पावणेदोन लाखांचा कांदा लुटला

पावणेदोन लाखांचा कांदा लुटला

Next
ठळक मुद्देटाकळी फाटा : ट्रकच्या ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करून डांबले

नाशिक : द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरलेल्या २३७ गोण्या लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी फाट्याजवळ महामार्गावरून आडगावच्या दिशेने कांदा वाहून नेणाºया ट्रकचालकास स्कॉर्पिओमधून आलेल्या (एमएच १५, ईपी ७४५७) लुटारूंनी कारला कट मारल्याचे कारणावरून दमदाटी करून ट्रक रोखली. यावेळी कारमधून खाली उतरलेल्या दोघांनी चालक सोमनाथ रयाजी चव्हाण (४८, दत्तनगर, अभोणा) व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनरला ट्रकमधून खाली ओढत मारहाण केल्याचे ट्रकचालक चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी चव्हाण यांच्याजवळ असलेली ५० हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली. यानंतर जवळच्या एका बंगल्यात क्लिनरसह चव्हाण यांना डांबून ठेवले. दरम्यान, चौघांनी त्कांद्याने भरलेल्या गोण्यांपैकी ज्युटच्या खाकी रंगाच्या १०० तर लाल रंगाच्या १३७ असा एकूण ११ टन वजनाचा माल लंपास केला.

रोकड हिसकावली
महामार्गावर लूट करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, एका पांढºया रंगाच्या स्कॉर्पिओमधून या टोळीने येऊन कांद्याचा ट्रक लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लुटारूंनी ट्रकचालकास मारहाण केली व ५० हजारांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलिसांना अद्याप लुटारूंचा शोध लागू शकलेला नाही. स्कॉर्पिओच्या क्रमांकावरून कार जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट होते. बाजारभावानुसार या मालाची किंमत १ लाख ७३ हजार २५ रुपये आहे, असे चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक गिरी करीत आहेत.

Web Title: Pawedon plundered millions of onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.