वसुलीकडे लक्ष द्या; समाजसेवा म्हणून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:54+5:302021-06-10T04:10:54+5:30

सिन्नर : पाणीपुरवठा सुरळीत करणे म्हणजे समाजसेवेचे काम आहे. पाणीपुरवठा योजनेच्या वसुलीकडे लक्ष देण्यासह योजनेत समाविष्ट गावांना स्वच्छ आणि ...

Pay attention to recovery; Work as a social worker | वसुलीकडे लक्ष द्या; समाजसेवा म्हणून काम करा

वसुलीकडे लक्ष द्या; समाजसेवा म्हणून काम करा

Next

सिन्नर : पाणीपुरवठा सुरळीत करणे म्हणजे समाजसेवेचे काम आहे. पाणीपुरवठा योजनेच्या वसुलीकडे लक्ष देण्यासह योजनेत समाविष्ट गावांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी द्या. योजनेत राजकारण न आणता हेवेदावे बाजूला ठेवून काम केल्यास ते पुण्याचे काम ठरेल, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सदस्यांची विशेष बैठक पार पडली. त्यावेळी गटविकास अधिकारी मुरकुटे बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समिती सदस्य रवींद्र पगारा, बाबासाहेब कांदळकर, विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, विठ्ठल उगले आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा समितीची मुदत संपल्यामुळे नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती. सदर योजना आदर्श बनविण्यासाठी समितीच्या सदस्यांनी प्रयत्न करावेत. योजनेला मीटर बसवून पाणीपुरवठा करून, योग्य वसुली करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी मुरकुटे यांनी केल्या.

अध्यक्षपदासाठी वावीचे माजी सरपंच विजय भीमराव काटे यांच्या नावाची सूचना कानिफनाथ घोटेकर यांनी केली. त्यास सर्वांनी अनुमोदन दिले, तर उपाध्यक्षपदी मलढोण येथील ताराबाई शिवाजी हालवर, तर सचिवपदी पाथरेचे ग्रामसेवक नितीन मेहरखांब यांची सर्वानुमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष काटे यांचा मुरकुटे, रवींद्र पगार, बाबासाहेब कांदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपाध्यक्ष हालवर व सचिव मेहरखांब यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. शरद चतुर, रश्मी चिने, शरद घोडेराव, दत्तू चिने, सुजाता नरोडे, कानिफनाथ घोटेकर, मीराबाई शेळके, गीतांजली शिंदे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-----------------

आमदार माणिकराव कोकाटे यांनी राबविलेल्या योजनेत समाविष्ट गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करावे.

-विजय काटे, नवनिर्वाचित अध्यक्ष,

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना

----------------------

वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या अध्यक्षपदी विजय काटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, रवींद्र पगार, बाबासाहेब कांदळकर, प्रल्हाद बिब्बे, नितीन मेहरखांब आदी. (०९ सिन्नर १)

===Photopath===

090621\09nsk_8_09062021_13.jpg

===Caption===

०९ सिन्नर १

Web Title: Pay attention to recovery; Work as a social worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.