शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:29 IST2018-03-10T01:29:26+5:302018-03-10T01:29:26+5:30

नाशिक : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली.

Pay attention to Sharad Pawar's meeting | शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष

शरद पवार यांच्या सभेकडे लक्ष

ठळक मुद्देनेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश

नाशिक : राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेऊन राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी ४ वाजता येथील गोल्फ क्लब मैदानावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार असून, त्यादृष्टीने जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्टÑवादीचे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. राष्टÑवादीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोप सभेनंतर तब्बल दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच येथील गोल्फ क्लब मैदानावर शरद पवार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जाहीर सभा होत आहे़ वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबरोबरच आगामी काळात सत्ताधाºयांशी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना या सभेतून दिला जाणार आहे. सुमारे दीड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा केला जात असून, त्यासाठी ठिकठिकाणी बैठका, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे; शिवाय शहरात फलक, झेंडे, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. राष्टÑवादी यानिमित्ताने उत्तर महाराष्टÑातील आपले बळ आजमावणार आहे. केंद्र व राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या जाहीर सभेत शरद पवार काय संबोधित करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असले तरी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची सुरू असलेली तयारी, अलीकडेच झालेल्या पूर्वाेत्तर तीन राज्यांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी बजावलेली भूमिका, राष्टÑपुरुषांच्या पुतळ्यांची झालेली विटंबना, एनडीए सरकारमधून तेलगु देसमसारख्या पक्षाने घेतलेली फारकत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना सत्ताधाºयांच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा संदेश देण्याचा व त्याच निमित्ताने निवडणुकीची तयारी करण्याचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पक्षनेत्यांचे शहरात आगमन होणार असून, त्यानिमित्ताने शहरात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
दहा वर्षांनंतर गोल्फ क्लब दुमदुमणार
राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या सन २००७ मध्ये नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप गोल्फ क्लब मैदानावरील सभेने झाला होता. तत्पूर्वी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कॉँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व शरद पवार यांची एकत्रित सभा या मैदानावर झाली होती. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनंतर गोल्फ क्लब मैदानावर राष्टÑवादी कॉँग्रेस आपली ताकद आजमावत आहे. या मैदानावर यापूर्वी दिवंगत सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याही सभा झाल्या आहेत.
छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायावर चर्चा
राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणाºया या जाहीर सभेत छगन भुजबळ यांच्यावर केल्या गेलेल्या सूडबुद्धीच्या कारवाईची चर्चा या जाहीर सभेतून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुजबळ यांच्यावरील न्यायालयीन प्रक्रियेस जाणूनबुजून लावला जाणारा विलंब, त्यांच्यावर उपचार करण्यास होणारी हलगर्जी या सर्व गोष्टींची जाहीर चर्चा राष्टÑवादी कार्यकर्ते करीत असून, भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या भूमीत होणाºया या सभेत अन्यायावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

Web Title: Pay attention to Sharad Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.