देवळा, येवल्यात पैसे अदा : मनमाडला संचालकांची तयारी दोन बाजार समित्यांवर टांगती तलवार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:20 AM2018-06-01T01:20:27+5:302018-06-01T01:20:27+5:30
नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले.
नाशिक : शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया पाचपैकी देवळा व येवला बाजार समित्यांच्या संचालकांनी व्यापाºयांकडे शेतकºयांचे थकलेले पैसे परत केल्यामुळे पदांना तूर्त अभय मिळाले असून, मनमाड बाजार समितीच्या संचालकांनीच शेतकºयांचे पैसे परत करण्यासाठी अनामत भरण्याची तयारी दर्शविली, तथापि, मालेगाव व उमराणे बाजार समित्यांच्या प्रयत्नांना व्यापाºयांकडून दाद मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
या संदर्भात सहकार खात्याने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर जूनच्या दुसºया आठवड्यांत सुनावणी होणार आहे. मालेगाव, देवळा, उमराणे, मनमाड व येवला या पाच बाजार समित्यांमध्ये कार्यरत व्यापाºयांनी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत बाजार समितीत लिलावासाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकºयांकडून मालाची खरेदी केली व त्याबदल्यात शेतकºयांना धनादेश किंवा आरटीजीएस करण्याचे आश्वासन दिले. व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे अदा न केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात साधारणत: २० व्यापाºयांनी १४१९ शेतकºयांचे ४ कोटी ९५ लाख रुपये थकविले असून, अशा व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आदेश बाजार समित्यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेता उलट त्यांना अभय दिले. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी व्यापाºयांना परवाने देताना बाजार समित्यांनी कायदा व नियमांना हरताळ फासल्याचा आक्षेप घेत पाचही बाजार समित्यांच्या संचालकांना नोटिसा बजावून त्यांचे संचालकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती व त्यावर संचालकांना लेखी म्हणणे मांडण्यासाठी येत्या ११ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या नोटिसीमुळे अडचणीत आलेल्या संचालकांनी ज्या व्यापाºयांनी शेतकºयांचे पैसे थकविले त्यांचा शोध घेऊन शेतकºयांचे थकीत पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळे येवला व देवळा येथील शेतकºयांचे पैसे व्यापाºयांनी परत केले आहेत, तर मनमाड बाजार समितीच्या संचालकांनी शेतकºयांचे व्यापाºयांकडे थकलेले पैसे परत करण्याची हमी घेत तेव्हढी रक्कम बाजार समितीत अनामत म्हणून जमा करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्यावेळी व्यापाºयांकडून पैसे येतील त्यावेळी संचालक आपली अनामत रक्कम परत घेतील. मात्र मालेगाव व उमराणे या दोन बाजार समितीत अनुक्रमे ८६९ शेतकºयांचे २ कोटी ९६ लाख ७६ हजार व १३५ शेतकºयांचे १ कोटी ३८ लाख थकल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.