पेड व्हॉट्स अ‍ॅपला पैसे देताय, सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:58 AM2017-07-25T00:58:58+5:302017-07-25T00:59:17+5:30

नाशिक : आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा!

Pay to the paid whites app, be careful ..! | पेड व्हॉट्स अ‍ॅपला पैसे देताय, सावधान..!

पेड व्हॉट्स अ‍ॅपला पैसे देताय, सावधान..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा! त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अशा बोगस संदेशांना आणि लिंकला प्रतिसाद देऊ नका, अशी सूचना सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. व्हॉट्स अ‍ॅप आॅडिट झालेल्या तरुणाईबरोबरच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करीत असतात. अनेकदा त्यात आर्थिक फसवणुकीचा धोका असू शकतो. सध्या व्हॉट्स अ‍ॅप पेड होत असल्याच्या पोस्टही फॉरवर्ड केल्या जातात. व्हॉट्स अ‍ॅप वापराचे एक वर्ष फ्री सबस्क्रीप्शन संपल्यानंतर त्याचे पैसे द्यावे लागतील अशाप्रकारची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपने केली होती. मात्र कालांतराने म्हणजेच गेल्याच वर्षी जानेवारी २०१६ मध्ये ही सूचना रद्द करण्यात आली. परंतु त्यानंतरही आता व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश येत असून, त्यात तुमचे एक वर्षाचे सबस्क्रीप्शन संपणार आहे. पुढील सेवा कायम सुरू ठेवण्यासाठंी पेमेंट करा, असा हा संदेश असून, त्याखाली त्याची लिंकही देण्यात आली आहे. ही कॉम्प्युटर वेबवर लिंक क्लीक केली की एक पेमेंट पेज उघडले जाते. त्यात बॅँक डिटेल्सची माहिती भरण्यास सांगितली जाते. विशेष म्हणजे संगणकाचा माउस त्यावर नेऊन क्लीक केले की, आपल्या बॅँकेची वेबसाईट उघडली जाते. त्यामुळे वापरकर्ता त्यावर पटकन आपली माहिती भरत जातो. परंतु येथेच घोळ होण्याची शक्यता आहे. कारण बॅँकेची ही वेबसाईटच फेक म्हणजे बनावट असते.

Web Title: Pay to the paid whites app, be careful ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.