..मग पाच रुपयांत थाळी आत्ताच द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:41 AM2019-10-19T01:41:13+5:302019-10-19T01:42:23+5:30

मतदार राजा जागा होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांना कुणी प्रश्नच विचारत नसल्याने सत्तेवर कुणाचाही अंकुश नसल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.

.. Pay the plate for only five bucks now! | ..मग पाच रुपयांत थाळी आत्ताच द्या !

..मग पाच रुपयांत थाळी आत्ताच द्या !

Next
ठळक मुद्देभटक्या

मतदार राजा जागा होत नसल्याने सत्ताधिकाऱ्यांना कुणी प्रश्नच विचारत नसल्याने सत्तेवर कुणाचाही अंकुश नसल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. खरे तर लोकशाहीत सरकारवर अंकुश असला पाहिजे ही अपेक्षाही तशी गैर नाही. सरकारविरुद्ध आवाज उठविण्यासाठी जनता सक्षम होईल तेव्हा होईल, परंतु सरकारात जाऊ पाहणाºया उमेदवाराला मात्र जनता जाब विचारू लागले असल्याचा प्रसंग एका प्रचार रॅलीदरम्यान समोर आला आहे. इंदिरानगर परिसरातील एका चौकात प्रचार रॅलीतील लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे प्रचारकर्त्यांसाठी वडापाव मागविण्यात आला. वडापाववर पुढील रॅलीत या प्रचारकर्त्यांना सहभागी व्हायचे असल्याने त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आणखी एकेक वडापाव घ्या, पुढे भरपूर लांब जायचे असल्याचे सांगताच प्रचारासाठी आलेल्या एका इसमाने थेट उमेदवारालाच भाबडा प्रश्न केला. दहा रुपयांचा वडापाव देऊन लांबवर चालण्याची अपेक्षा करण्यापेक्षा पाच रुपयांची थाळी आत्ताच द्या! म्हणजे पोटभर खाऊन कितीही लांब चालता येईल. त्या प्रचारकर्त्याच्या प्रश्नाने मात्र त्या उमेदवाराचा चेहरा वड्यासारखा चांगलाच फुगला होता.

शेवटी मी काय परका माणूस...
वि धानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने आता उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते जिवाचे रान करून प्रचारकार्याला लागले आहेत. आपल्या प्रचारासाठी पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्याने यावे यासाठी काही उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांची मनधरणी केली होती; परंतु राज्यस्तरीय नेत्यांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुसºया फळीतील किंवा दुय्यम नेते प्रचारासाठी हजेरी लावताना दिसत आहेत. एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असेच दुसºया फळीतील असलेले नेते आले होते. सकाळीच नववसाहतीतून प्रचारफेरी निघाली. उघड्या जीपमध्ये उमेदवारासोबत उभे राहण्यासाठी काही कार्यकर्त्यांची चढाओढ लागली होती. त्यामुळे बाहेरून प्रचारासाठी आलेल्या ‘त्या’ दुय्यम नेत्याला उभे राहण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे जीपमध्ये खूप मागे-मागे सरकत सरकत तो ‘बिचारा’ आता पडतो की काय अशी परिस्थिती झाली. त्यातच पुन्हा एक-दोन जण जीपमध्ये जागा नसताना चढण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा तो नेता वैतागून म्हणाला, ‘चला भाऊ तुम्हीपण जीपमध्ये चढा, तुम्ही इथले असल्याने लोक तुम्हाला ओळखतील शेवटी मी काय परका माणूस, मला कोण विचारणार?’ आणि कोण नमस्कार घालणार ?
बार बार की अब की बार...
सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोहोचत आहे. राजकीय पक्षांची सभा संमेलने होत आहेत. राज्यातील नव्हे तर अन्य राज्यातील नेतेदेखील प्रचारासाठी येत आहेत. त्यांना स्थानिक राजकारण माहिती नसल्याने बºयाचदा गोंधळ उडतो. एका अन्य राज्यांतील नेत्याची सभा नुकतीच पार पडली. ज्याच्या प्रचारासाठी सभा झाली ते प्रथमच आमदार झाले आणि दुसऱ्यांदा निवडणूक लढवित होते; मात्र याचवेळी त्यांनी संबंधित उमेदवाराने खूप कामे केली असून, त्यांना वारंवार निवडून तुम्ही देत असतात, त्यामुळे यंदाही पुन्हा एकदा निवडून द्या असे सांगताच अनेक जण बुचकळ्यात पडले, तर नेत्याला स्थानिक राजकारणाची माहिती नसल्याने अनेकांना हसू आवरता आले नाही.

Web Title: .. Pay the plate for only five bucks now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.