जिल्हा बॅँकेत बनावट नोटांचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:43 AM2017-10-26T00:43:42+5:302017-10-26T00:43:46+5:30
चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करून सुमारे २६ हजार रु पयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : चालू आठवड्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अज्ञात इसमाने चलनातील नव्या पाचशे व हजाराच्या बनावट नोटा तयार करून सुमारे २६ हजार रु पयांचा भरणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने सीबीएसजवळील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये पाचशे रुपयांच्या २६ नोटा व हजार रु पयांच्या १३ नोटा असे एकूण २६ हजार रु पयांची रक्कम भरली. सदर भामट्याने चलनातील नव्या नोटांप्रमाणे भासणाºया बनावट नोटा तयार करून त्याचा भरणा बॅँकेत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बॅँकेचे मुख्य रोखपाल नितीन गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी अज्ञात इसमाविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केदार करीत आहेत.