गॅस सबसिडीची रक्कमही किसान योजनेंतर्गत अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:42 AM2019-02-27T00:42:26+5:302019-02-27T00:42:31+5:30
दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर पुन्हा परत घेण्यात आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम असताना आता गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची थेट बॅँक खात्यात जमा होणारा अनुदानित परताव्याची रक्कमदेखील पंतप्रधान किसान योजनेंतर्गत बॅँकांकडून अदा केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नाशिक : दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर पुन्हा परत घेण्यात आल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम असताना आता गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती गॅस सिलिंडरची थेट बॅँक खात्यात जमा होणारा अनुदानित परताव्याची रक्कमदेखील पंतप्रधान किसान योजनेंतर्गत बॅँकांकडून अदा केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ज्या ज्या ग्राहकांनी गॅस सिलिंडरची खरेदी केली, अशांना त्यांचा परतावा थेट बॅँकेत जमा झाल्याचे बॅँकेचे लघु संदेश आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीशी देशभरातील शेतकरी सामना करीत असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतकºयाच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयाच्या नावे दोन हेक्टरपर्यंत लागवडी योग्य जमीन असणे आवश्यक असून, सरकारी सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता पेन्शनर, सरकारी अधिकारी, अन्य कर्मचाºयांना याचा लाभ मात्र मिळणार नाही. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट शेतकºयांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने त्यासाठी शेतकºयांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी शेतकºयांच्या नावे दोन हजार रुपये बॅँकेत जमा करण्यात आले, या जमा झालेल्या रकमेबाबत शेतकºयांमध्ये एकीकडे आनंद व्यक्त केला जात असताना काही शेतकºयांच्या खात्यावरील पैसे परत काढून घेण्यात आले आहेत. त्याबाबत ठिकठिकाणाहून तक्रारी येत असून, काहींनी पैसे न मिळाल्याबद्दल तक्रारीही केल्या आहेत. असे असताना गॅस सिलिंडरची बॅँकेत जमा होणारी अनुदानाची रक्कमदेखील आता बॅँकेत ‘पीएम-किसान’ या नावाने जमा होत असल्याचे लघु संदेश गॅसग्राहकांना बॅँकेकडून पाठविले जात आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियमकडून एका गॅसग्राहकाला त्याच्या कॅस मेमो क्रमांक १११५१२८ वर १५५ रुपये ९५ पैसे बॅँकेत जमा केल्याचा संदेश दोन दिवसांपूर्वी भ्रमणध्वनीवर आला असताना, ग्राहकाच्या नावे बॅँकेत जमा झालेले १५५ रुपये मात्र ‘पीएम-किसान’ या नावाने जमा झाल्याचे दाखविण्यात आले. गॅस सिलिंडरची अनुदानाची रक्कम किसान योजनेच्या नावे जमा करण्याच्या शासनाच्या या प्रकारामुळे गॅसग्राहकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.