टीडीएस कपातीसह भरणाही आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:03 AM2018-10-19T00:03:31+5:302018-10-19T00:10:20+5:30

केंद्र सरकारला कर कपातीतून मिळणाऱ्या करापैकी सर्वाधिक वाटा हा टीडीएसचा असून, टीडीएसची रक्कम कपात करण्यासोबतच कपात केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत वेळीच जमा करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेची असल्याचे प्रतिपादन टीडीएस नाशिक रेंजचे अतिरिक्त आयकर आयुक्त हेमंतकुमार लेऊवा यांनी केले.

 Payment required with TDS deduction | टीडीएस कपातीसह भरणाही आवश्यक

टीडीएस कपातीसह भरणाही आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देकरदात्यांना मार्गदर्शन : वेळेत टीडीएस न भरल्यास सात वर्षांपर्यंतची शिक्षा

नाशिक : केंद्र सरकारलाकर कपातीतून मिळणाऱ्या करापैकी सर्वाधिक वाटा हा टीडीएसचा असून, टीडीएसची रक्कम कपात करण्यासोबतच कपात केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत वेळीच जमा करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेची असल्याचे प्रतिपादन टीडीएस नाशिक रेंजचे अतिरिक्त आयकर आयुक्त हेमंतकुमार लेऊवा यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयकर विभाग नाशिकच्या टी.डी. एस. रेंज अंतर्गत टीडीएस कपात, भरणा व अन्य तांत्रिक माहितीविषयी जनजागृती कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी टीडीएस नाशिक सर्कलचे आयकर उपायुक्त अजयकुमार सिंह, आयकर अधिकारी रमेश वाघमारे, हरिष अय्यर, निरीक्षक गोपाल इसाई, संतोष कुमार, सुनील कुमार सिंग, मनीषकुमार सिंग, भूषण डागा आदी उपस्थित होते. हेमंतकुमार लेऊवा म्हणाले, काही संस्थांकडून आर्थिक वर्षाच्या अखेरीस टीडीएसची रक्कम जमा केली जाते. त्यामुळे संबंधितांसह यंत्रणेचीही गैरसोय होते. वेळच्या वेळी रक्कम जमा करताना प्रक्रि येत सुलभता यावी व संभाव्य चुका टाळता याव्यात यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, विविध तांत्रिक सत्रांमध्ये उपस्थिताना टीडीएससंबंधितची तांत्रिक माहिती देण्यात आली, तर करदात्यांच्या विविध प्रश्नांचे व समस्यांचे अधिकाºयांनी निराकरण केले.

Web Title:  Payment required with TDS deduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.