महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

By admin | Published: November 12, 2016 02:31 AM2016-11-12T02:31:09+5:302016-11-12T02:27:22+5:30

महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

Payment of Rs. 4.5 crores to the MSEDCL two | महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

Next

नाशिकरोड : महावितरण कंपनीने वीज बिलापोटी रद्दबातल ठरविलेल्या ५०० व एक हजारांची नोट स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर शुक्रवारी एक दिवसांत नाशिक विभाग २ मधून तब्बल साडेचार कोटीची वसुली झाली आहे. अगोदर महावितरणने १००० व ५०० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र ऊर्जामंत्र्यांनी आदेश देताच वीज बिल केंद्रे उघडण्यात आली.केंद्राने ५०० व एक हजाराची नोट चलनातुन रद्दबातल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महावितरण कंपनीने देखील वीज बिलापोटी त्या नोटा स्वीकारण्यास बुधवार, गुरूवार असमर्थता दर्शविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री व महावितरणचे अधिकारी यांची गुरूवारी सायंकाळी संयुक्त बैठक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलापोटी ग्राहकांकडून पाचशे व एक हजाराच्या रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे जाहीर केले होते.
महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र खाजगी वीज कलेक्शन सेंटर, एटीएम मशीन या ठिकाणी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी वीज बिलाची रक्कम स्वीकारण्यात येत होती. यामध्ये शुक्रवारी एका दिवसातच नाशिक विभाग-२ मधुन जवळपास साडेचार कोटीची चालु व थकीत वीज बिलांची वसुली झाली आहे. सायंकाळी ७ वाजता खाजगी वीज बिल कलेक्शन सेंटर बंद करण्यात आले होते.

Web Title: Payment of Rs. 4.5 crores to the MSEDCL two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.