ऊस उत्पादकांचे पेमेंट बँक खात्यामध्ये  झाले वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:38 AM2021-04-23T01:38:24+5:302021-04-23T01:38:43+5:30

कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे  प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. 

Payment of sugarcane growers to the bank account | ऊस उत्पादकांचे पेमेंट बँक खात्यामध्ये  झाले वर्ग

ऊस उत्पादकांचे पेमेंट बँक खात्यामध्ये  झाले वर्ग

Next
ठळक मुद्देकादवा : १०६ दिवसांमध्ये केले दोन लाख ७७ हजार साखर पोत्यांचे उत्पादन

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे  प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. 
अनेक कारखाने मागील वर्षाची एफआरपी पूर्ण देऊ शकले नसताना कादवाने मागील वर्षाची एफआरपी संपूर्ण अदा करीत  एकूण  २४४० रुपये ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केली आहेत. उर्वरित एफआरपी रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात येणार आहे. 
कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाला असून ऊस लागवड वाढावी यासाठी कारखान्याचे प्रयत्न सुरू आहेत.  सीडफार्ममध्ये ऊस रोपे बनविण्यात येत असून त्याची    बुकिंग सुरू 
आहे.  
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  उधारीने रासायनिक खतांचे वाटप लवकरच गट कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले.
सर्वाधिक एफआरपी
कादवाने या गळीत हंगामात सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांच्या सहकार्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून १०६ दिवसात २ लाख ३५ हजार ९३३ मे. टन उसाचे गाळप करीत ११.७५ टक्के साखर उताऱ्यानुसार २ लाख ७७ हजार ३०० साखर पोती उत्पादित केली आहेत. कोणत्याही उपपदार्थाची निर्मिती नसतानाही उत्तर महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा कादवाची एफआरपी ही २७३६ अशी  सर्वाधिक आहे. 

Web Title: Payment of sugarcane growers to the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.