किरकोळ घटना वगळता शहरात शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:51 AM2018-01-03T00:51:59+5:302018-01-03T00:54:43+5:30
नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़
07 वाहनांचे झाले नुकसान
20 संशयित घेतले ताब्यात
1500 पोलिसांचा ताफा
नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसविणाºयांवर सायबर सेलची नजर असून, अशांवर कारवाई केली जाणार आहे़
सोशल मीडियावरून पसरलेल्या संदेशामुळे भीमा-कोरेगाव घटनेचे राज्यात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले़ नाशिकरोड परिसरातील सामाजिक संघटनांनी या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले़ दुपारी देवळाली कॅम्प परिसर बंद ठेवण्यात आला तर गरवारे पॉइंटवर रास्ता-रोकोसाठी आलेल्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले़ सोशल मीडियावर वॉचसोशल मीडियावरील फे सबुक, व्हॉट्स अॅप, टिष्ट्वटर याद्वारे भीमा-कोरेगाव घटनेबाबत मोठ्या संख्येने व्हिडीओ तसेच भडकविणारे संदेश पाठविण्यात आले असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे अशा प्रकारचे संदेश पाठविणारे ग्रुप, तसेच व्यक्तींवर आयुक्तालयातील सायबर शाखेचा विशेष वॉच आहे़ त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे संदेश व्हायरल न करता डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ आयुक्तालयात शांतता समितीची बैठक
भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले़ आमदार सीमा हिरे यांनी नाशिक हे शांतताप्रिय शहर असून, त्यास गालबोट लागणार नाही याबाबत सदस्यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी शांतता समितीतील सर्वधर्मिय सदस्यांसह पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़दीड हजार पोलीस रस्त्यावर
विविध राजकीय पक्ष व संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि़३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात अफवा पसरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील ११० वरिष्ठ पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी, आरसीपी, क्यूआरटीच्या टीम रस्त्यावर असणार आहे़ याबरोबरच एसआरपीएफ व होमगार्डची जादा कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली आहे़ कायदा हातात घेऊ नका
भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा
व सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या साप्ताहिक
सुट्या बंद करण्यात आल्या आहेत़ शहरात दीड
हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी व चेक पॉइंट लावण्यात आला आहे़ सोशल मीडियावर अफवा व भडकाऊ संदेश पाठविणाºयांवर सायबर सेलचा वॉच असून, थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़
- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक