इंदिरानगरला शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:54 AM2020-02-17T00:54:51+5:302020-02-17T00:56:16+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती
इंदिरानगर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे असून, यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी शांतता समितीच्या बैठकीत सांगितले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात शिवजयंतीनिमित्त शांतता समिती व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती
नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. तसेच कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. वडाळा-पाथर्डी रोडने होणारी अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांनी केली. तसेच चेतनानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याची तक्रार करण्यात आली. चेतनानगर ते वासननगरदरम्यान गतिरोधक टाकावे, पाथर्डी गावातील अवैधरीत्या चालणारी मद्यविक्र ी बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, सहायक निरीक्षक राकेश भामरे उपस्थित होते. यावेळी शांतता समिती सदस्य उपस्थित होते.