ईद निमित्ताने शांतता समितीची घोटी पोलिस ठाण्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:30 PM2020-07-30T17:30:57+5:302020-07-30T17:58:41+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या विषाणूंच्या धर्तीवर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, खाटीक, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता घोटी पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी दि.१ आॅगस्ट रोजी साजरी होणारी बकरी ईद हा मुस्लिम बांधवाचा सण तालुक्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेली राष्ट्रीय एकात्मतेची व सर्वधर्म जोपासण्याची परंपरा ही अखंडती राखावी व कोराना विषाणुसंसर्गाच्या पाशर््वभुमीवर महामारीचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन नियमाचे काटेकोर पालन करावे, बकर ईदचे नमाज पठण हे सार्वजनिक ठिकाणी करू नये, गोवंश प्रतिबंधीत हत्या कायद्याचे पालन करावे अशी सुचना व मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, माजी सरपंच मदन रु पवते, जावेद नालबंद, कचरू मराडे, शिवा काळे, संजय जाधव, आरिफ सैय्यद सागर धांडे गोपनीय कर्मचारी गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.