पीकअप व्हॅन उलटून २५ शेतमजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:10 PM2018-08-27T19:10:54+5:302018-08-27T19:11:06+5:30

दह्याणे शिवारात अपघात : जखमींवर कळवणला उपचार

 Peacock van recovered, 25 injured seriously | पीकअप व्हॅन उलटून २५ शेतमजूर जखमी

पीकअप व्हॅन उलटून २५ शेतमजूर जखमी

Next
ठळक मुद्देबहुतांशी मजुरांना मुका मार लागला असून जखमींना रु ग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कळवण : भुसणी येथील शेतमजूर देवळा तालुक्यात मजुरीसाठी घेऊन जात असताना दह्याणे शिवारात पीक अप मालवाहू गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात २५ शेतमजूर जखमी झाले आहेत. यात बहुतांशी मजुरांना मुका मार लागला असून जखमींना रु ग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
देवळा तालुक्यात पावसाळी कांदा लागवड सुरु असल्याने कळवण तालुक्यातील शेतमजूर खाजगी वाहने व माल वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीतून मजुरीसाठी जातात. सोमवारी (दि.२७) सकाळी भुसणी येथील शेतमजूर देवळा तालुक्यात मजुरीसाठी जात असताना दह्याने शिवारात अपघात होऊन २५ शेतमजूर जखमी झाले असून बहुतांशी रु ग्णांना हात, पाय, कंबरेवर मुका मार लागला आहे तर तिघांचे हात मोडले आहेत. उपचार करून काही रु ग्णांना घरी सोडण्यात आले तर जबर मार लागलेल्या रु ग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात रु ग्णांवर अस्थिरोग तज्ज्ञ डॉ प्रशांत खैरे यांनी तातडीने प्राथमिक औषधोपचार केले. यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल व सहकारी बांधवांनी रु ग्णांना तातडीने मदत केली.
अपघातातील जखमी
अपघातात कल्पना मोठाभाऊ सोनवणे (४०), आशा पोपट पवार (१८), अमोल एकनाथ गांगुर्डे (१८), रोशनी भाऊसाहेब गांगुर्डे (२१) , अहल्याबाई रामदास सोनवणे (२२), आशाबाई विलास बागुल (४०), मोठाभाऊ रामा सोनवणे (४९), विलास रामदास बागुल (५०), वर्षा बापु गायकवाड (१४), अलकाबाई बापू गायकवाड (३५), सिताबाई भगवान गांगुर्डे (२९), वंदना अनिल पवार, (२८), जिजाबाई आत्माराम सोनवणे (४५), विठाबाई एकनाथ गावित (३४), रोशनी रामवन महाले (१३), ठगूबाई सावळीराम गांगुर्डे (३०), कांचन सावळीराम गांगुर्डे (१०), पार्वताबाई विनायक गायकवाड (५०) बहिराबाई सोनवणे (५०),सुकराबाई खंडु पीठे (५३), रंजना भावडू सोनवणे (२३), रेखा भाऊसाहेब पवार (१३), दिव्या लक्ष्मण आंबेकर (१४) हे जखमी झाले आहेत.

Web Title:  Peacock van recovered, 25 injured seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.