पीककर्ज हमीसाठी शिखर बॅँक सकारात्मक

By admin | Published: May 21, 2017 02:22 AM2017-05-21T02:22:27+5:302017-05-21T02:22:41+5:30

शेतकऱ्यांना वाटपासाठी दीडशे कोटींच्या पीककर्जाची हमी घेण्याबाबत सकारात्मक भूमिका राज्य शिखर बॅँकेने घेतल्याची माहिती बॅँकेचे संचालक खासदार चव्हाण यांनी दिली.

Peak Bank Positive | पीककर्ज हमीसाठी शिखर बॅँक सकारात्मक

पीककर्ज हमीसाठी शिखर बॅँक सकारात्मक

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राज्य शिखर बॅँकेकडे १७८ कोटींच्या ठेवी असून, त्यापोटी आगामी खरीप हंगामात ज्यांनी पीककर्ज भरले आहे, अशा शेतकऱ्यांना वाटपासाठी दीडशे कोटींच्या पीककर्जाची हमी घेण्याबाबत सकारात्मक भूमिका राज्य शिखर बॅँकेने घेतल्याची माहिती बॅँकेचे संचालक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.
भाजपा आमदार व खासदारांच्या तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. २०) नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख व राज्य शिखर बॅँकेचे अध्यक्ष एल.एम. सुखदेवे यांच्या उपस्थितीत सुभाष देशमुख यांच्या सरकारी सुरूची बंगल्यावर सकाळी बैठक झाली. बैठकीस जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तब्बल ११ संचालक उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हा बॅँकेने केलेले कर्जवाटप, त्यापोटीची थकबाकी, टॉप ट्वेन्टी थकबाकीदार यांची माहिती त्यांनी घेतली. बैठकीस जिल्हा बॅँक संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, धनंजय पवार यांच्यासह ११ संचालक उपस्थित असल्याचे कळते.

Web Title: Peak Bank Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.