शेतकरीवर्ग धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:34 AM2019-09-27T01:34:50+5:302019-09-27T01:37:08+5:30
नाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरीपाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे कृषी विभाग व शेतकऱ्यांनी हात टेकले असून, वेळीच तिचा उपद्रव रोखला नाही तर जवळपास ८० प्रकारच्या पिकांना अळी विळखा मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पेरणीनंतर लगेचच मक्याला कवेत घेणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता आपला मोर्चा मका पिकाला लागून असलेल्या पिकांकडे वळविला असून, बाजरीपाठोपाठ आता द्राक्षबागांवरही लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. या अळीच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे कृषी विभाग व शेतकऱ्यांनी हात टेकले असून, वेळीच तिचा उपद्रव रोखला नाही तर जवळपास ८० प्रकारच्या पिकांना अळी विळखा मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मूळ अमेरिका त्यानंतर भारतात उत्तराखंडाच्या मार्गाने प्रवेश करणाºया अमेरिकन लष्करी अळीने यंदा खरिपाच्या मक्यावर घाला घातला लष्करी अळीचा बाजरी, द्राक्ष पिकांना वेढाआहे. प्रारंभी स्वीटकॉर्नवर आढळलेली अळी खरिपात सरसकट मक्यावर दिसू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवरील मक्यापैकी एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पीक सप्टेंबरपर्यंत नष्ट झाले आहे. लागवडीनंतर अवघ्या महिनाभरात मक्यावर ठाण मांडणाºया या लष्करी अळीने प्रारंभी मक्याच्या पानावर घाला घातला व त्यानंतर आता तर थेट मक्याच्या कणसात प्रवेश केल्याने तिचा नायनाट करण्यासाठी शेतकºयांनी वापरलेल्या महागड्या औषधांचाही तिच्यावर परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ताशी ४५० किलोमीटरच्या वेगाने प्रवास करणाºया लष्करी अळीकडून २२ दिवसांतच अंडी दिली जाते व त्याचे प्रमाणही दोन हजार अंडी एकाच वेळी पिकावर सोडली जात असल्याने तिचा प्रसार व प्रादुर्भाव वेगाने होत आहे. मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडल्यावर मक्यावरील अळीचा प्रादुर्भाव जोराच्या पावसाने कमी होईल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला होता; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही शेतकºयांनी उभ्या मक्याच्या पिकावर रोटर फिरवून दुसºया पिकाची तयारी केली, परंतु पिकावरून मातीत अंडी घातलेल्या लष्करी अळीने दुसºया नवीन पिकालाही लक्ष्य केले आहे. मक्याला वेढा दिल्यानंतर आता लगतच्या शेतातील बाजरी व द्राक्षबागांवरही या अळ्या आढळू लागल्या असून, त्यामुळे काढणीला आलेली बाजरी व छाटणीला आलेल्या द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. झपाट्याने संपूर्ण पीकच कवेत घेणाºया या अळीच्या धास्तीने काही द्राक्षबागायतदारांनी पिकावर चिकट पट्टीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
जेणेकरून द्राक्षबागेच्या शेंड्यावर चढणारी लष्करी अळी चिकटपट्टीला चिकटून तेथेच अडकून पडणार आहे. साधारणत: हंगामपूर्व द्राक्ष घेणाºया पट्ट्यातील शेतकºयांनी या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली. मक्याच्या चाºयाने जनावरांना त्रासलष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला मका शेतकºयांकडून काढून टाकला जात असून, त्याचा चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जात आहे. परंतु या चाºयावरही अळीचे वास्तव्य असल्याने चाºयाच्या रूपाने ती जनावरांच्या पोटात जाऊ लागली आहे. त्यामुळे जनावरांचे पोट फुगणे, दूध कमी देणे, सुस्तपणा येणे असे आजार होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना या गोष्टीची माहिती नसून जनावरांच्या शेणातूनही लष्करी अळीचा प्रादुर्भाव फोफावत चालल्याचे प्रथमदर्शनी दिसू लागले आहे.