तिघा पादचारी देवीभक्तावर काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:11 PM2019-04-15T22:11:01+5:302019-04-15T22:11:39+5:30

कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.

On the pedestal of three pedestrians, | तिघा पादचारी देवीभक्तावर काळाने घातली झडप

तिघा पादचारी देवीभक्तावर काळाने घातली झडप

Next
ठळक मुद्देकळवण : पायी जाणाऱ्या यात्रेकरुंना खासगी वाहनाने दिली जोरदार धडक





कळवण : अनेक किमी अंतर पायी वाटचाल करत मजल दरमजल करून चैत्रोत्सव निमित्ताने आई भगवतीच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या तिघा देवीभक्तावर कळवणजवळ कोल्हापूर फाटा येथे सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास काळाने झडप घातल्याने एक देवीभक्त जागीच ठार झाला तर दोन नाशिक येथे औषधोपचार दरम्यान मृत्युमुखी पडल्याने या अपघातात ३ ठार तर दोघे जखमी झाले.
देवीभक्त नांदुरीकडे पायी जात असताना कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाºया खासगी प्रवासी वाहतूक गाडीने (एम एच १९ सी एफ ०७५१) कोल्हापूर फाटा येथे पादचारी देवीभक्ताना मागून धडक दिली, त्यात गुंजाळनगर येथील शुभम बापू देवरे हे जागीच ठार झाले, तर त्यांचे चार सहकारी देवीभक्त जखमी झाले. जखमीना कळवण उपजिल्हा रु ग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर दुपारी औषधोपचार सुरु असताना त्यापैकी दोघांचा मृत्यु झाला. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि १५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील खालप येथील देवीभक्त कळवण शहरापासून चार किमी अंतरावर कोल्हापूर फाटा परिसरातुन सप्तश्रुंगी गडाकडे पायी पदयात्रेने चालले होते त्यावेळी कळवणकडून नाशिककडे भरधाव वेगाने खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या एम एच १९ सी एफ ०७५१ या ट्रक्स क्रु झर गाडीने पाठीमागून रस्त्यावरील पादचारी देवीभक्ताना उडवल्याने त्यात शुभम बापू देवरे (१७) गुंजाळनगर (देवळा) हा झालेल्या अपघातात जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेले कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (२५), भाऊसाहेब पुंडलिक पवार (१५) यांच्यासह ३० ते ३५ वयोगटातील दोन भावीक जखमी झाले असून त्यांची ओळख पटलेली नसल्याने त्यांची नावे समजू शकली नाही.
दरम्यान घटनास्थळी कळवणचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठुमसे तपास करीत आहेत.

- सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणार्या भाविकांनी रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने सावध रीतीने चालावे तसेच रणरणते उन्हाने रस्ते तापलेले आहेत. चालताना भाविकांना त्रास होतो. म्हणून वाहन धारकांनी नेहमीच्या वेगापेक्षा हळू वेगाने वाहने हळू चालवावी. प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रमोद वाघ -
पोलीस निरीक्षक कळवण.

Web Title: On the pedestal of three pedestrians,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.