भुयारीमार्ग वापराकडे पादचाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:09+5:302021-04-11T04:15:09+5:30
नाशिक : काेट्यवधी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या वापराकडे पादचारी पाठ फिरवित आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ...
नाशिक : काेट्यवधी रुपये खर्च करून साकारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या वापराकडे पादचारी पाठ फिरवित आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण करूनही हा भुयारी मार्ग अजूनही बंदच आहे. पादचारी रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतरही याभागात वाहतूक कोंडी होत आहे.
ऑनलाईन सातबारा मिळविण्यातअडचण
नाशिक : भूमीअभिलेख संकेतस्थळावर शासनाने ऑनलाईन सातबारा सेवा चालू केली आहे. परंतु संथ गतीने चालणारे इंटरनेट तसेच , इंटरनेटद्वारे सातबारा ऑनलाईन पद्धतीने मिळविण्याची माहिती नसल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घरकाम कामगारांचे नियोजन कोलमडले
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे घरकाम करणाऱ्या कामगारांचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेक घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद होत असल्याने स्वयंपाक, धुणीभांडी करणाऱ्या महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नाशिक : कोरोनापसून बचावासाठी तोंडाला मास्क लावा, असे विविध मध्यमांद्वारे सांगितले जात असले तरी अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मास्कची सक्ती असताना त्याकडे दुर्लक्ष करणारांवर कठोर करवाई करण्याची मागणी होत आहे.
मोकाट जनावरांची केविलवाणी स्थिती
नाशिक : वाढत्या कोरोनमुळे शहर परिसरात निर्बंध लागू करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना खाद्य मिळत नसल्याने त्यांची केविलवाणी स्थिती झाली आहे.
निर्बंधांमुळे माठविक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प
नाशिक : शहरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. परंतु दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येणारे माठ विक्रेते यावर्षी अद्याप दिसत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केल्याने माठविक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे.
जनजीवन पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा
नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात निर्बंध लागू केल्याने अनेकांचा उद्योग व्यवसाय प्रभावित झाला आहे. त्यामुळे अनेकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे भाडेकराराने राहणाऱ्या नागरिकांसोबतच अनेक घरमालकही अडचणीत आले आहेत. या सर्वांना जनजीवन पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा आहे.
वीज देयके ऑनलाईन भरण्याचे आवाहन
नाशिक : कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये आणि वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी ग्राहकाना वीजबिलाची देयके ऑनलाईन भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वीज बिल अकरणीसाठी ग्राहकांना वीज मीटरचा फोटो काढून पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रविशंकर मार्गावर दुर्गंधीचे साम्राज्य
नाशिक : डीजीपीनगर परिसरातील श्रीश्री रविशंकर मार्गालगत असलेल्या नाल्याची सफाई होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील नाल्याची महापालिकेच्या सफाई विभागाने नियमित सफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.