चिंचोली शिवारात वादळी वाऱ्याने पीकअप वाहनाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:43 PM2019-06-13T14:43:46+5:302019-06-13T14:43:58+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात वादळी वाºयासह झालेल्या पावसाने शेतीसह पीकअप गाडीचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वा-यासह पावसामुळे चिंचोली शिवारातील अनेक झाडे उन्मळून पडले आहे.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात वादळी वा-यासह झालेल्या पावसाने शेतीसह पीकअप गाडीचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वा-यासह पावसामुळे चिंचोली शिवारातील अनेक झाडे उन्मळून पडले आहे. अनेक ठिकाणी वीजेचे खांबही जमिनोदस्त झाले आहे. याच वादळी वाºयात नितीन गणपत उगले यांच्या पिकअप गाडीवर झाड पडुन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात वादळी वा-यामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप, माजी सरपंच संजय सानप, सरपंच दत्तु नवाळे, पोलिस पाटील मोहन सांगळे यांनी पाहणी केली. त्यानतंर तलाठी ए. डी. फसाळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चिंचोली शिवारातील अनेक शेताच्या बांधाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामाला लागले आहे. येत्या आठवड्यात परिसरात अजून एखादा पाऊस झाल्यास खरीपाच्या लागवडी बरोबर पेरणीच्या कामाची शेतकरी सुरवात करतील.