दिंडोरी पोलिसांची हेल्मेटसक्तीसाठी दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:13 PM2019-02-04T18:13:09+5:302019-02-04T18:13:31+5:30
दिंडोरी : हेल्मेट सक्तीची पोलीसांच्या जनजागृती मोहीमे नंतर आता प्रत्यक्ष हेल्मेट न वापरण्यावर दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे.
दिंडोरी : हेल्मेट सक्तीची पोलीसांच्या जनजागृती मोहीमे नंतर आता प्रत्यक्ष हेल्मेट न वापरण्यावर दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली आहे.
पहिले दोन दिवस दुचाकी धारकांना गुलाबपुष्प व माहिती पत्रक पोलिस पथकाने देवून जनजागृती करत हेल्मेट वापरांबाबत आवाहन करण्यात आले होते. हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांची मोहीम दिंडोरी शहरातील नाशिक-कळवण राज्य मार्गावर राबविण्यात आल्या नंतर दिंडोरी-जानोरी मार्गावरील जानोरी एअरपोर्ट येथे सिटबेल्ट न लावणाऱ्या चारचाकी आणि हेल्मेट नवापरणाºया दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. या मोहिमेत पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, ए. एस. बैरागी, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर आव्हाड, एस. के. जाधव, दिलीप पगार, माळेकर आदींच्या पथकांनी दिवसभर दंडात्मक कारवाई केली. (फोटो ०४ दिंडोरी हेल्मेट)