कांदा व्यापाऱ्याला दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:02 AM2019-05-19T01:02:36+5:302019-05-19T01:04:31+5:30
निफाड येथील कांदा व्यापाºयास दिलेले धनादेश न वटल्याच्या आरोपात मुंबई येथील कांदा व्यापारी रमेश नांबियार यास निफाडचे न्या. एस. बी. काळे यांनी दोनही धनादेशाच्या दुप्पट तीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
निफाड : येथील कांदा व्यापाºयास दिलेले धनादेश न वटल्याच्या आरोपात मुंबई येथील कांदा व्यापारी रमेश नांबियार यास निफाडचे न्या. एस. बी. काळे यांनी दोनही धनादेशाच्या दुप्पट तीस लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
निफाड येथील कांदा व्यापारी सुशील ट्रेडर्सचे अजयकुमार सोनी यांनी २००६-०७ या वर्षात मुंबई येथील कांदा निर्यातदार व्यापारी पावरटेक वर्ल्डवाइड कंपनीचे संचालक रमेश नांबियार यांच्यासोबत सुमारे पाच कोटी ९९ लाख रु पयांच्या कांदा विक्रीचे व्यवहार केले होते. पैकी तीन कोटी सतरा लाख रुपयांचा परतावा नांबियार यांनी केला होता. मात्र उर्वरित दोन कोटी ८१ लाख रु पये येणे बाकी होते. त्यापोटी दिलेले धनादेश न वटल्याने स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयासमोर साक्षीपुराव्यावरून न्यायाधीश एस.बी. काळे यांनी पावरटेक वर्ल्डवाइड कंपनीचे संचालक रमेश नांबियार यास एका खटल्यातील दहा लाखाच्या धनादेशाच्या दुप्पट वीस लाख रुपये दंड एक महिन्याचे आत भरण्याची शिक्षा सुनावली.