कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:46 IST2018-08-29T00:46:25+5:302018-08-29T00:46:45+5:30
: घारपुरे घाट, जोशीवाडा, मल्हारखाण झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शौचालयांची दयनीय स्थिती, प्रभागातील ब्लॅकस्पॉट, अनियमित येणारी घंटागाडी अशा प्रश्नांची सरबत्ती करत नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिका-यांना धारेवर धरले.

कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
नाशिक : घारपुरे घाट, जोशीवाडा, मल्हारखाण झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शौचालयांची दयनीय स्थिती, प्रभागातील ब्लॅकस्पॉट, अनियमित येणारी घंटागाडी अशा प्रश्नांची सरबत्ती करत नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिका-यांना धारेवर धरले. महानगरपालिका पश्चिम प्रभाग समितीची मासिक बैठक मंगळवारी (दि.२८) पार पडली. यावेळी सभापती वैशाली भोसले, नगरसेवक वत्सला खैरे, हेमलता पाटील, योगेश हिरे, योगीता भामरे यांच्यासह महापालिकेचे नितीन नेर, नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे, उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. घंटागाडी नियमित येऊनही शहरात ठिकठिकाणी लोक कचरा टाकत असून अशा ब्लॅकस्पॉटवर कचरा टाकणा-यांवर आता बिनधास्त दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सभापती भोसले यांनी दिले आहेत. कच-याचे वर्गीकरण करून न देणाºया हॉटेल्सवरही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जोपर्यंत लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटत नाही, कचरा वर्गीकरणाची सवय लागत नाही तोपर्यंत वारंवार प्रबोधन करावे, दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. घंटागाड्यांची जीपीएस यंत्रणा नीट कार्यान्वित आहे का याची तपासणी करून घ्यावी, घंटागाडी कर्मचाºयांना नागरिकांशी चांगले वागण्याच्या सूचना द्याव्यात, रस्ते झाडणाºया काही कर्मचाºयांबाबत नागरिकांच्या तक्रारी असून त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे यासाठी त्यांच्या मुकादमांना सूचना देण्याविषयी सांगण्यात आले.
अशा आहेत मागण्या
अग्निशमन दलाकडे साहित्य, प्रशिक्षण आदी गोष्टी व्यवस्थित असून, मनुष्यबळ वाढवून मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाहत्या ड्रेनेजबाबत संबंधितांना तत्काळ नोटीस बजवावी, असे आदेशही यावेळी देण्यात आले. गाडगे महाराज दवाखाना पूर्ववत सुरू करावा, अशा सूचना देण्यात आल्या. आडव्या-तिडव्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या लवकरात लवकर कापल्या जाव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.