घरात डेंग्यू डास आढळल्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:53 AM2018-08-25T00:53:23+5:302018-08-25T00:53:28+5:30
डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे.
नाशिक : शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. दरम्यान तीन आठवड्यात शहरात डेंग्यूचे ८९ रुग्ण आढळले असून, संतप्त शिवसेनेने भाजपा आणि प्रशासनावर प्रहार केला आहे. सत्ता वागवता येत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे.
डेंग्यू डासांची संख्या वाढत असून, सर्वेक्षणात हजारो घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होताना आढळले आहे. या मोहिमेमुळे महापालिकेने आता घराच्या परिसरात अस्वच्छता पसरविणाºयांवरच कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.