साठवण तलावात पोहणाऱ्या तीन युवकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:26 PM2019-04-16T17:26:55+5:302019-04-16T17:27:00+5:30
येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते.
येवला : येवला नगर परिषदेच्या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांना नगरपालिकेच्या विशेष पथकाने पकडले. या तीन युवकांचे मोबाइल पथकाने जप्त केले असून, त्यांना ५०० रु पयांचा दंड करण्यात आला. येवला पालिकेच्या साठवण तलावाचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो; मात्र काही जण या तलावात पोहत असल्याचे निदर्शनास येत होते. या साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या साठवण तलावात स्वत:च्या जिवाशी खेळणाºया तीन युवकांना पालिकेने धडा शिकविला आहे; मात्र अशाच प्रकारची सुरक्षा कायमस्वरूपी ठेवावी, अशी अपेक्षा आहे. पोहणाºया युवकांना दंड केल्याने आता पोहण्यासाठी कोणीही धजवणार नाही; मात्र तलावाच्या बाजूला संरक्षक भिंत असल्याने अनेक जीव वाचतील व साठवण तलावाचे अस्तरीकरण केले तर पाणी गळतीदेखील थांबेल. पाण्याअभावी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. तसेच साठवण तलावाचे अस्तरीकरण किंवा प्लॅस्टिक कागद टाकणे यांसारख्या उपाययोजना राबविल्या तर पाणी चोरीसाठी मोठा प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने याबाबतदेखील कार्यवाही करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
तसेच नगरपालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने आतापर्यंत अवैध नळ कनेक्शन बंद करणे, पाणी वाया घालविणाºया नागरिकांना दंड ठोठावणे तसेच पाण्याचा गरजेपुरता वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अशी कामे हाती घेतली आहेत. तसेच साठवण तलावातील पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथक विशेष लक्ष पुरवीत आहे. सदर पथकाने शहर हद्दीतील विनापरवानगी चालू असलेले बोअरिंगचे काम बंद पाडून संबंधितांकडून दंड वसूल केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.आचारसंहिता असल्याने प्रत्येक कारवाई गंभीरतेने करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा गरजेपुरता वापर करावा तसेच इतरांनाही पाणी मिळेल याची काळजी घेऊन नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले. (१६ येवला साठवण तलाव)