विना मास्क प्रवेश करणाऱ्यांवरहोणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 03:50 PM2020-10-05T15:50:09+5:302020-10-05T15:51:07+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे.
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथे येणाºया नागरीकांनी टाकेद गावामध्ये प्रवेश करतांना तोंडाला मास्क न लावल्यास दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतने गावातील दुकानदार व ग्रामस्थ यांच्या एकमताने सुरू केली आहे.
ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात घोटी नंतर खरेदी विक्र ी व व्यवहारासाठी टाकेद हीच सर्वांना सोयीस्कर एकमेव प्रमुख बाजारपेठ आहे. येथे आंबेवाडी वासाळी पासून ते भरवीर अडसरे ते अकोले तालुक्यातील एकदरे, कोकणवाडी, बिताका खिरवीरे आदींसह चाळीस वाड्या व पंचवीस तीस ग्रामपंचायती आदी ठिकाणाहून दररोज शेकडो लोक दररोज ये-जा करतात.
कोवीड-१९ ची सुरवातीला असलेली दहशत आता मात्र लोक पाळतांना दिसत नाही. नागरीक बिंधास्तपणे वावरत असल्याचे लक्षात येताच व गावात कोरोनाने शिरकाव केल्याने सरपंच ताराबाई बांबळे, उप-सरपंच रामचंद्र परदेशी, सदस्य सतिष बांबळे, विक्र म भांगे, नंदा शिंदे, कविता धोंगडे, लता लहामटे, रतन बांबळे, राम शिंदे यांनी ग्रामपंचायतमध्ये गावातील सर्व दुकानदार, ग्रामस्थांसमवेत सुरक्षित अंतर ठेवत मिटींग घेऊंन दुकानदार व ग्राहकाला मास्क नसल्यास दोघांनाही दंड करण्याबाबतचा ठराव एकमताने करण्यात आला.त्यानुसार पहिल्याच दिवशीं हजारों रु पये दंड वसुल करण्यातही आला. गावात ग्रामपंचायतकडून ध्वनिक्षेपकाच्याद्वारे माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझा गाव माझी जबाबदारी, मास्क वापरा कोरोना टाळा,महिन्यातून दोन वेळेस थर्मल आरोग्य तपासणी,जंतू नाशक औषध फवारणी, सॅनिटायझर, कोरोना बचाव जनजागृती आदी उपक्र म राबविण्यात येत आहे.
विना मास्क आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून दोनशे रु पये दंड वसुल करण्यासाठी ग्रामपंचायतने या पेक्षाही कड़क भुमिका घेऊन विना मास्क व्यवहार करणारे पकडून देणाऱ्यांना दंड रकमेतून ठरावीक टक्केवारी बक्षीस दिल्यास यापेक्षाही कड़क अंमलबजावणी होईल असे सुचविण्यातआले. मास्क सॅनिटायझरचा काटेकोरपणे पुरेपूर वापर करा असे परिसरातील सर्व प्रवासी वाहनधारकांना ग्रामस्थ नागरिकांना ग्रामपंचायतकडून आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिक्रि या...
टाकेद ही परिसरातील एकमेव बाजारपेठ असल्याने बुधवार हा बाजाराचा दिवस संपूर्ण गाव, गावातील दुकाने बंद असतात,माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून माझा गाव माझी जबाबदारी ही भूमिका घेऊन ग्रामीण भागात होत असलेला कोरोनाचा शिरकाव लक्ष्यात घेता विना मास्क गावांमध्ये प्रवेश करणाºयांवर सर्वानुमते दोनशे रु पये दंड ठेवण्यात येत आहे.
- ताराबाई रतन बांबळे, सरपंच, टाकेद बु.