डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई
By admin | Published: June 30, 2015 01:29 AM2015-06-30T01:29:34+5:302015-06-30T01:31:44+5:30
डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई
नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या भिंतीजवळील नो पार्किंगमध्ये कार उभी करून त्यावर पोलीस प्रशासनाचे चिन्ह असलेल्या डॉक्टरला सोमवारी दुपारी वकिलांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला़ वकिलांच्या गदारोळानंतर या डॉक्टरवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली़ रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या भिंतीलगतच्या नो पार्किंगमध्ये शहरातील शेख नामक डॉक्टरने आपली कार (एमएच १५, डीएस २७७) पार्क केली़ यावेळी तेथून जात असलेले न्यायालयातील ज्येष्ठ वकील झुंजार आव्हाड व कारचालकाचा किरकोळ वाद झाला़ मुळात ही गाडी नो पार्किंगमध्ये, त्यात गाडीच्या काळ्या काचा तसेच गाडीवर हायवे पेट्रोलिंग असे लिहिलेले स्टिकर होते़ हा प्रकार अॅड़ आव्हाड यांनी वाहतूक पोलिसांना दाखवित कारवाईची मागणी केली़ यामुळे रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी ही कार सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणली़ या ठिकाणी कारचालकाची ओळख पटविल्यानंतर संबंधित डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ (प्रतिनिधी)