केरकचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:41 AM2018-05-13T00:41:42+5:302018-05-13T00:41:42+5:30
महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले.
नाशिक : महापालिकेमार्फत मान्सूनपूर्व सुरू असलेल्या नालेसफाईची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) केली. यावेळी नाल्यांमध्ये केरकचरा टाकणे, सांडपाणी सोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी आरोग्याधिकाºयांना दिले. शहरातील सहाही विभागात सुमारे २५ कि.मी. लांबीचे ६५ नाले आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने नाल्यांसह पावसाळी चेंबर, ड्रेनेजचे चेंबर यांची साफसफाई सुरू आहे. या कामांची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी पूर्व विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील नाला, रविशंकर मार्गावरील नाल्याची पाहणी करून त्यांनी नाल्यातील मटेरियल पूर्ण उचलून नाल्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यालगतचे चेंबर्स, कॅच पिट स्वच्छ ठेवणे तसेच रस्त्यालगतची माती उचलून घेण्याचे आदेश आरोग्य विभागास देण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी नाशिकरोड विभागात जाऊन वास्तू पार्क, औटे मळा, जयभवानीरोड आणि सुभाषरोड येथील नाल्यांची पाहणी करून नाले पूर्ण रुं दीपर्यंत व पूर्ण खोलीपर्यंत साफ करून मटेरियल उचलून घेण्याच्या सूचना दिल्या, तसेच नाल्यात केरकचरा टाकणे व सांडपाणी सोडणाºयांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य अधिकाºयांना दिले. पंचवटी विभागात नांदूर नाका येथील चेंबर्सजवळील व रस्त्याच्या फॅनिंगमधील माती उचलून घेणे, नाले पूर्ण रुंदीचे साफ करून सीडीवर्क जवळ रस्त्याचे पाणी नाल्यात जाण्याकरता योग्य चाºया करणे, गुंजाळ मळारोड साईड गटार एक ते दीड मीटर रुं द व खोल करणे, वाघाडी नदीमधील मटेरियल उचलून पाण्याला जास्तीत जास्त मार्ग मोकळा करणे आदी सूचनाही आयुक्तांनी दिल्या. सदर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आले.