रस्त्यावरील वाहनांवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:05 AM2018-12-01T01:05:12+5:302018-12-01T01:05:41+5:30

शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे.

 Penalty action will be taken against vehicles on the roads | रस्त्यावरील वाहनांवर होणार दंडात्मक कारवाई

रस्त्यावरील वाहनांवर होणार दंडात्मक कारवाई

Next

नाशिकरोड : शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व ‘नो पार्किंग’ जागेत उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांना टोर्इंग करून त्यांच्यावर शनिवारी (दि.१) दंडाची कारवाई केली जाणार आहे.  नाशिकरोड भागातील काही रस्त्यावर वाहने वाहनचालक उभी करत असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत असते. नो पार्किंगच्या जागेत सर्रासपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी व बेशिस्तपणे कुठेही वाहने उभी करणाºया वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा युनिट ४कडून नोटप्रेस मेनगेट व समोरील भिंतीलगत, शिवाजी पुतळा ते रेल्वेस्थानक, मुक्तिधाम ते बिटको चौक व बिटको चौक ते नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत दुतर्फा नो पार्किंगमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारी दुचाकी टोर्इंग करून नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करून आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार आहे. इतर गरजेच्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्याबाबत वाहतूक शाखेकडून पाठपुरावा केला जात आहे. वाहन चालकांनी नो पार्किंग व वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने गरज नसलेले हे पदपथ काढुन टाकण्यासाठी  मनपाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसेच आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक या  ठिकाणी प्रवासी भाडे शोधण्यासाठी भरचौकात गरागर फिरणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.
टोर्इंग कारवाई फक्त आर्थिक दंडासाठी का?
शहर वाहतूक शाखेकडून शनिवारपासून नाशिकरोड भागात मुख्य हमरस्त्यावरील ‘नो पार्किंग’मध्ये उभी राहणारी दुचाकी वाहने टेम्पोमधून टोर्इंग करून दंडाची कारवाई केली जाणार आहे. मात्र नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई केली जाणार नाही. दुचाकीपेक्षा चारचाकीमुळे वाहतुकीची कोंडी जास्त प्रमाणात होत असताना सुद्धा शहर वाहतूक शाखेकडे क्रेन उपलब्ध नसल्यामुळे चारचाकी वाहनांवर प्रारंभी कारवाई केली जाणार नाही. वाहतूक कोंडी सोडविण्याचा व बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर दुचाकीवरील टोर्इंगची कारवाई ही फक्त आर्थिक महसुलासाठी केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियोजनाची खरी गरज
बिटको ते देवळालीगाव, बिटको ते शिवाजी पुतळा व शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा कडेला मनपाने पदपथ बांधले आहेत. या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात दुकाने असून, ग्राहकांना उंच पदपथमुळे आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. वास्तविक या पदपथाच्या बहुतांश जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वसले असून, या पदपथाच्या पादचाºयांना कुठलाही फायदा होत नाही.

Web Title:  Penalty action will be taken against vehicles on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.