धनादेश न वटल्याने पावणे दोन लाखांचा दंड
By admin | Published: August 8, 2016 01:01 AM2016-08-08T01:01:23+5:302016-08-08T01:01:33+5:30
धनादेश न वटल्याने पावणे दोन लाखांचा दंड
नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने संबंधित संशयित आरापी बबन केरू अहेर (५५) यास एक लाख ७५ हजारांचा दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अधिक कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
अजित विष्णू फाटक (६५) यांनी अहेर विरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. न्यायाधीश के. एम. पिंगळे यांनी खटल्याचा निकाल देत अहेर यास दोषी ठरविले. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अधिक कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मैत्रीच्या संबंधातून अहेर यांनी एक लाख तीस हजार रुपये फाटक यांच्याकडून उसनवार घेतले होते.
या रकमेचा धनादेश फाटक यांना आहेर यांनी दिला ; मात्र बॅँकेत सदर धनादेश वटला नाही. त्यामुळे फाटक यांनी न्यायालयात दाद मागली होती. अपिलाचा कालावधी संपल्यानंतर फिर्यादी फाटक यांनी एक लाख साठ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)