प्रलंबित तलाठी सजा निर्मिती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:12 PM2020-06-12T21:12:12+5:302020-06-13T00:16:08+5:30
येवला : नाशिक महसूल विभाग अंतर्गत नवीन सज्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव 2017 मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु सदर प्रस्तावावर कार्यवाही बाकी होती. जिल्हाभरात नवीन सजा निर्मितीला सुरु वात करण्यात आलेली असून येवला तालुक्यासाठी आता 50 सजा आणि 8 महसूल मंडळे असणार आहेत. या अंतर्गत तालुक्यात राजापूर व अंगणगाव ही दोन नवीन महसूल मंडळे तयार करण्यात आली आहे.

पाटोदा महसूल मंडळात येणारा ठाणगाव सजा आता सावरगाव महसूल मंडळ जोडण्यात आला असून यातून कानडी हे गाव या सजातून वगळण्यात आले. ते आडगाव सजाला जोडण्यात आले. तर आडगाव सजाला पूर्वीपासून जोडलेले विखरणी हे गाव कमी करून विखरणी येथे स्वतंत्र सजाची निर्मिती करण्यात आली. त्याचा समावेश सावरगाव महसूल मंडळांतर्गत करण्यात आला. पाटोदा महसूल मंडळा अंतर्गत आता निळखेडे व कातरणी हे दोन नवीन सजे असणार आहेत.
-------------------------------
सोमठाणदेश सजेत आंबेगावचा समावेश
शिरसगाव लौकी सजामध्ये केवळ शिरसगाव लौकि व वळदगाव हे गावे असतील. यामधून लौकी शिरस वगळण्यात आले. सोमठाणदेश यासजामध्ये सोमठाणदेश व आंबेगाव हे गावे असतील. पूर्वीच्या सोमठाणादेश सजा मधून निळखेडे हे गाव कमी करून निळखेडे येथे स्वतंत्र सजा निर्माण करण्यात आला आहे. या सजामध्ये लौकी शिरस हे गाव समाविष्ट असेल.
---------------------------------------
कातरणी गावासाठी स्वतंत्र सजा राहील, तर पाटोदा सजामध्ये दहेगाव समाविष्ट असेल. आडगाव रेपाळ सजामधील पूर्वीचे विखरणी कमी करून आता आडगाव रेपाळ, मुरमी व कानडी ही गावी असतील. कातरणी, विखरणी व निळखेडे साठी स्वतंत्र सजा निर्मिती झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नवीन तलाठ्यांना उपविभाग वाटपाची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.