डिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्त बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे हजारो पेन्शनधारक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:08 AM2017-12-29T01:08:29+5:302017-12-29T01:09:22+5:30
नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही.
नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही. वयोवृद्ध पेन्शनधारकांना नवीन वर्षातच बॅँकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहून कोेषागार कार्यालयातील कर्मचारीही बॅँकांच्या त्रासाला कंटाळले आहेत.
नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजारांहून अधिक सेवानिवृत्त कर्मचाºयाची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचाºयांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. अशा बॅँकांची व त्यांच्या शाखांची संख्या सुमारे २५०च्या आसपास आहे. त्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित कर्मचाºयाने आपल्या हयातीचा पुरावा बॅँकेकडे वा कोषगार कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते.
गिरणारेत सर्वच पेन्शनधारकांवर संकट
नाशिक तालुक्यातील गिरणारे व पंचक्रोशीत राहणारे जवळपास १०३ पेन्शनधारक असून, या सर्वांचे युको बॅँकेत खाते आहेत. सर्वच पेन्शनधारकांनी आपली माहिती वेळेत बॅँकेत सादर करूनही युको बॅँकेने एकाही पेन्शनधारकाची माहिती कोषागार कार्यालयाला कळविली नाही. परिणामी या गावातील सर्वच पेन्शनधारकांना नवीन वर्षात आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार असून, तसाच प्रकार नांदगाव तालुक्यातील बोलढाण येथील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत घडला आहे. येथील ४३ पेन्शनधारकांची माहिती कोषागार कार्यालयाला प्राप्त न झाल्याने त्यांचेही वेतन रोखण्यात आले आहे.