सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून मिळणार पेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 08:33 PM2020-10-29T20:33:49+5:302020-10-30T01:28:15+5:30
सातपूर :- सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास आता पेन्शनसाठी खेटे मारण्याची गरज पडणार नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेन्शन लागू होणार आहे.नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पेन्शन वाटप योजनेचा शुभारंभ करुन पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे.
सातपूर :- सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास आता पेन्शनसाठी खेटे मारण्याची गरज पडणार नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पेन्शन लागू होणार आहे.नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पेन्शन वाटप योजनेचा शुभारंभ करुन पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे.
$$ आयुष्यभर काबाड कष्ट करुन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास वेळेवर पेन्शन सुरु व्हावी एवढीच अपेक्षा असते.पेन्शन सुरु व्हावी म्हणून पीएफ कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.त्यात बऱ्याच वेळा आस्थापनाकडून कागदपत्रांची पूर्तता होत नसे.अशा सभासदांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयास योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून पेन्शन सुरु केली जाते.
त्यासाठी सदर कामगार सेवानिवृत्त होणार असलेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा क्लेम फॉर्म (10 डी) कंपनीतर्फे पी.एफ.कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.हा फॉर्म मंजूर करुन त्यास सेवनिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून पेन्शन ऑर्डर दिली जाते.म्हणजेच दुसऱ्या दिवसापासून पेन्शन सुरु होते.या योजनेचा शुभारंभ नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात करण्यात आला.ऑक्टोबर महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या ईपीएस 1995 सभासदांना भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम.एम.अशरफ यांच्या हस्ते पेन्शन ऑर्डरचे वाटप करण्यात आले.प्रयास योजनेअंतर्गत पेन्शन धारकांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित आस्थापनांनी वेळेत क्लेम पाठवावेत असे आवाहन पीएफ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.