पेन्शनधारकांचा मोर्चा
By admin | Published: July 14, 2017 01:08 AM2017-07-14T01:08:23+5:302017-07-14T01:08:36+5:30
सातपूर : विविध मागण्यांसाठी पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : जास्त वेतन जास्त पेन्शन यासह पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१३) नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सेवानिवृत्तांच्या प्रलंबित प्रश्नांबरोबरच शासनाच्या नवीन नियमांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबत ईपीएफ संघटनेच्या वतीने आंदोलन उभारण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता आयटीआय येथून मोर्चाला प्रारंभ झाला.
नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व फेडरेशनचे संस्थापक राजू देसले, जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, सुभाष काकड, विलास विसपुते, शिवाजी शिंदे, बापू रांगणेकर, चेतन पणेर, नारायण आडणे, प्रवीण पाटील, प्रकाश नाईक, एम. एन. लासुरकर, सुरेश कासार, कृष्णा शिरसाठ, श्रीकांत साळसकर, निवृत्ती शिंदे, नाईम शेख, सुभाष पाटील, नामदेव बोराडे, सुभाष शेळके, विष्णू गायखे आदींनी केले. या मोर्चात पेन्शनर प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.