केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:07 AM2018-08-28T01:07:27+5:302018-08-28T01:08:03+5:30

चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे.

 The people of Kerala want the power equipment, sanitation tools | केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

Next

नाशिक : चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेने याकामी पुढाकार घेतला असून, आजपर्यंत सुमारे ७० टन वस्तू रेल्वेने पाठविण्यात आल्या आहेत.  केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखून त्यांना मदत पाठविली जावी यासाठी नाशिकमधील केरळ असोसिएशन व भारत भारदी संस्थेचे पदाधिकारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झटत आहे. नाशिक जिल्ह्यातून अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष, दानशूर व्यक्तींनी मिळेल त्या साधनांनी केरळसाठी मदत पाठविण्यास सुरुवात केली असली तरी, सदरची मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काही संस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे मदत कशी व कुठे पाठवायची याबाबत वारंवार विचारणा केली जात असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून केरळकडे जाणाºया रेल्वेगाड्यांमध्ये मदतीचे साहित्य रवाना करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार केरळकडे जाणाºया रेल्वेला साहित्य वाहतुकीसाठी विशेष बोगी जोडण्यात आली आहे.  मुंबईहून दररोज कायमकुल्लम, कर्णावल्लम, त्रिवेंद्रम येथे रेल्वे रवाना होत असून, नाशिकहून मंगला एक्स्प्रेस जाते. गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत केरळवासीयांसाठी मदत गोळा केली जात आहे.  पहिल्या टप्प्यात कपडे, बेडशिट्स, चटई, तयार पीठ, तांदूळ, साखर, दाळ, कपडे, कांदे, ब्लॅकेंट, महिलांसाठी कपडे असे सुमारे ४५ टन साहित्य रवाना करण्यात आले. तर दुसºया टप्प्यात औषधे, लहान मुलांसाठी लागणारे खाद्यपदार्थ, गहू गोळा करण्यात आले असून, २५ टन साहित्य सोमवारी रात्री रवाना करण्यात येणार आहे. केरळ पूरग्रस्तांना नेमके काय हवे याची माहिती केरळ असोसिएशनचे पारधन पिल्लई सातत्याने घेत असून, त्यांचे ५० सहकारी दिवस-रात्र याच कामात व्यस्त आहेत.
चारा, ब्लिचिंग पावडरची कमतरता
केरळच्या महापुरात सर्व वाहून गेल्यामुळे याठिकाणी सर्वच जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांसाठी चारादेखील पुरामुळे शिल्लक राहिला नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे. चाºयाअभावी जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे केरळवासीयांकडून चाºयाची मागणी होऊ लागली आहे. याचबरोबर पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, स्वच्छतेसाठी फिनेल, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी बल्ब, वायर, स्विचबोर्ड या उपकरणांची गरज निर्माण झाली आहे.
केरळ असोसिएशनचा पुढाकार
नाशिक शहरात देशातील ३० राज्यांतील लोक विविध ठिकाणी राहात असून, अशा सर्व परप्रांतियांनी एकत्र येऊन भारत भारदी असोसिएशनची स्थापना केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात या संस्थेने ३० भाषांमध्ये भाविकांशी संवाद व संपर्क साधण्याचे मोठे काम केले होते. सध्या ही असोसिएशन केरळ असोसिएशनच्या बरोबर उभी ठाकली आहे. पारधन पिल्लई हे केरळमधील पूरग्रस्तांशी संपर्क ठेवून असून, दररोज या संस्थेचे ५० सदस्य केरळ पूरग्रस्तांसाठी नेमक्या लागणाºया वस्तू व साधने गोळा करून ते रेल्वेमार्गाने पाठविण्याचे काम करीत आहेत.

Web Title:  The people of Kerala want the power equipment, sanitation tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.