कुंभनगरी के लोग तो बहुत बडे दिलवाले हैं..
By admin | Published: September 16, 2015 11:45 PM2015-09-16T23:45:41+5:302015-09-16T23:46:08+5:30
.उद्गार भाविकांचे : जोपासली माणुसकी, स्वयंसेवींकडून मदतीचा हात; भाविकांना पाण्यासह विविध खाद्यपदार्थांचे वाटप
नाशिक : महापर्वणीच्या औचित्यावर भाविकांना काही ठिकाणी बिस्किट पुडे, तर कोठे चहा, दूध, शुद्ध पाण्याच्या बाटल्या, अन्नदानाचे वाटप करत बहुतांश स्वयंसेवी नाशिककरांनी सढळ हाताने माणुसकी जोपासली. यावेळी परराज्यांतून आलेल्या लाखो भाविकांपैकी ज्यांच्यापर्यंत या सेवाकार्याचा लाभ पोहोचला, त्या भाविकांच्या मुखातून कुंभनगरी के लोग बडे दिलवाले हैं..., असे मनमोकळे उद्गार बाहेर पडले.
दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविक कुंभनगरी अर्थात नाशिक शहरात दाखल झाले होते. यावेळी भाविकांना भूक, तहानेची जाणीव काही संवेदनशील अशा स्वयंसेवी नाशिककरांनी ठेवून त्यांच्यापर्यंत मोकळ्या मनाने आपापल्या परीने ‘सेवा’ पोहचविण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही ठळक संस्था व वैयक्तिक स्तरावरील नाशिककरांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा धावता आढावा.