विकास साधण्यासाठी जनतेची साथ आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:22 PM2018-10-01T22:22:46+5:302018-10-01T22:23:19+5:30
निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे.
निकवेल : लोकसभा मतदारसंघ विकासात्मकदृष्ट्या आदर्श व्हावा हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असून, यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक गावात विकासकामांची रेलचेल आपण सुरू केली आहे.
विकासाचा आलेख उंचावण्यासाठी जनतेच्या खंबीर साथीची गरज असल्याची भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. निकवेल येथे व्यायामशाळा व विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांनी निकवेल येथे मंजूर झालेली अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा इमारत आदी कामे पूर्णत्वास आली आहे. डॉ. भामरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. डॉ. भामरे पुढे म्हणाले, गावात आता नवीन व अत्याधुनिक ग्रामपंचायत झाल्याने गावाचा कारभारदेखील आधुनिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निकवेलच्या ग्रामस्थांनी डॉ. भामरे यांचे बैलगाडीतून स्वागत केले. याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नीलेश वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. निकवेल गावासाठी व्यायामशाळा मंजूर केल्याबद्दल उल्लेखनीय विकासकामे दिल्याबद्दल गावाच्या वतीने डॉ. भामरे यांचे आभार मानण्यात आले. डॉ. भामरे मार्गदर्शनाने गावाची विकासाकडे वाटचाल होऊन अनेक प्रश्न सुटेल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामसेवक श्रीमती पवार, उपसरपंच चित्रा मोरे, उपसरपंच मुरलीधर वाघ, विवेक सोनवणे, विजय वाघ, रामचंद्र मोरे, अनिता वाघ, संजय सोनवणे, पोपट म्हसदे, भिका वाघ, नीलेश खरे, रामराव अनारे, पोलीसपाटील विशाल वाघ, संजय सोनवणे, धर्मेद्र महाजन, किरण वाघ, आबा अनारे, अशोक सोनवणे, संजय वाघ, कडू वाघ, बाजीराव अनारे, रमेश वाघ, अभिमान महाजन आदींसह ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.विकासासाठी प्रयत्नशील तरुण वर्गाकडून व्यायामशाळेची आग्रही मागणी होती ती पूर्ण करण्यात आली आहे. आता यामशाळेसाठी आधुनिक साहित्यदेखील उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन भामरे यांनी देऊन गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे वचन दिले. यावेळी फटाके फोडून व बैलगाडीतून मिरवणूक काढून भामरे यांचे स्वागत करण्यात आले.