पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:38 AM2019-07-17T01:38:46+5:302019-07-17T01:40:33+5:30
त्र्यंबकेश्वर येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
त्र्यंबकेश्वर : येथे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन कारणे शोधून उपाय करेलच मात्र पूर नियंत्रणासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन गावात पूर परिस्थिती का उद्भवते याबाबतचा शोध घेण्यासाठी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते. गावातील पूर परिस्थितीच्या बाबतीत लोकांनी केलेल्या तक्रारींवरून असे दिसते की, नागरिकांनी सहकार्य केल्यास बºयाच तक्र ारी सुटण्यास मदत होईल. कारण नदीपात्रात जिथून पाणी जाते, तेथेच कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तर काही ठिकाणी नदीपात्र लहान आहे, कारण लोकांनीच नदीपात्रात अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यामुळेही पूर परिस्थिती गंभीर होते. याबाबत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या ठिकाणांची पाहणी
प्रारंभी जिल्हाधिकारी आणि अधिकाºयांनी अहिल्या परिसरात भेट दिली. तेथून ते त्र्यंबकेश्वर मंदिरात आले. आवश्यक सूचना करून नंतर त्यांनी गोदावरी नदीपात्राची पाहणी केली. पथकाने मेनरोडवरील गंगास्लॅबची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे गाºहाणी मांडली.