गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक : तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत रवींद्रकुमार सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:00 AM2017-12-16T01:00:39+5:302017-12-16T01:01:57+5:30

नागरिकांच्या मदतीनेच गुन्हेगारी रोखणे शक्य असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

People need help to prevent crime: Ravindra Kumar Single in a meeting organized at Takshashila School | गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक : तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत रवींद्रकुमार सिंगल

गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक : तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत रवींद्रकुमार सिंगल

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकाचे नाव पोलिसांच्या वेबसाइटवर गुन्हेगारी प्रवृत्ती असणाºयांची माहिती कळवावी

नाशिकरोड : नागरिकांच्या मदतीनेच गुन्हेगारी रोखणे शक्य असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
देवळालीगीव राजवाडा मालधक्कारोडवरील तक्षशिला विद्यालयात आयोजित बैठकीत बोलताना डॉ. सिंघल म्हणाले की, अनेक रिक्षाचालक प्रवाशांना चांगली वागणूक देत नियमांचेदेखील पालन करीत असतात. मात्र काही रिक्षाचालक नियम पाळत नसल्याने सर्वसामान्यांचा रिक्षाचालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. चांगल्या रिक्षाचालकाचे नाव पोलिसांच्या वेबसाइटवर टाकले जात आहे. गुन्हेगारीबाबत माहिती देताना महिलादेखील मोठ्या हिमतीने पुढे येत असल्याने पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यास मदत होत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती असणाºयांची माहिती पोलिसांना निसंकोच कळवावी, असे आवाहन केले. व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजीराव महाजन, प्रियकीर्ती त्रिभुवन, माजी नगरसेवक सुनील वाघ, संस्थेच्या विश्वस्त ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भारत निकम व आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी मानले. कार्यक्रमास शेखर भालेराव, रामबाबा पठारे, दिलीप अहिरे, अनिल अहिरे, नितीन चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, समीर शेख, दिलीप खताळे, कुणाल काळे, किशोर खडताळरवी मोकळ आदी उपस्थित होते.

Web Title: People need help to prevent crime: Ravindra Kumar Single in a meeting organized at Takshashila School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस