आदिवासी भागातील जनतेने बिनधास्त घ्यावी कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:12+5:302021-05-06T04:15:12+5:30

पेठ : कोरोनासारख्या महामारीतून बचाव करण्यासाठी तसेच आदिवासी भागातील जनतेत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून ...

People in tribal areas should take the corona vaccine without hesitation | आदिवासी भागातील जनतेने बिनधास्त घ्यावी कोरोना लस

आदिवासी भागातील जनतेने बिनधास्त घ्यावी कोरोना लस

Next

पेठ : कोरोनासारख्या महामारीतून बचाव करण्यासाठी तसेच आदिवासी भागातील जनतेत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. उद्धव चौधरी यांनी आदिवासी समाजाने बिनधास्त लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले.

नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हरसूल, दिंडोरी, कळवण भागात स्थानिक जनतेत कोरोना विषाणूबाबत पसरलेले गैरसमज व अफवा यामुळे चाचण्या करणे किंवा लसीकरण करून घेण्यासाठी कोणीही धजावत नाहीत. यासाठी जनजागृती व्हावी, याकरिता सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोशल मीडियाचा वापर करणारे युवक, ग्राम समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. सुरगाणा तालुक्यातील रहिवासी व वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. उद्धव चौधरी यांनी बोलीभाषा व प्रमाणभाषेचा वापर करून आदिवासी भागातील जनतेत असलेले गैरसमज दूर केले.

सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून गावातील ग्राम समन्वयकांच्या मदतीने कोरोना चाचणी, उपचार व लसीकरणाबाबत ‘डोअर टू डोअर’ जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून, या कामात अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तालुका समन्वयक शिंदे, संदीप बत्तासे, विजय भरसट, डॉ. नीलेश पाटील, जयदीप गायकवाड, संदीप डगळे, रामदास दिवे आदींसह ग्राम समन्वयक सहभागी झाले आहेत.

फोटो - ०५उद्धव चौधरी

===Photopath===

050521\05nsk_28_05052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०५ उद्धव चौधरी 

Web Title: People in tribal areas should take the corona vaccine without hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.