धक्कादायक! झोपडीत राहणारे भटके लोक ड्यूप्लिकेट सोन्याचे मणी हाती देत घालायचे गंडा

By अझहर शेख | Published: January 27, 2024 04:21 PM2024-01-27T16:21:22+5:302024-01-27T16:23:03+5:30

राजस्थानचे तिघे जण ताब्यात.

People who was living in cottage used to hand out duplicate gold beads and wear them in nashik | धक्कादायक! झोपडीत राहणारे भटके लोक ड्यूप्लिकेट सोन्याचे मणी हाती देत घालायचे गंडा

धक्कादायक! झोपडीत राहणारे भटके लोक ड्यूप्लिकेट सोन्याचे मणी हाती देत घालायचे गंडा

अझहर शेख, नाशिक : खोदकामात आम्हाला सोन्याच्या मणी असलेल्या माळा सापडल्या आहेत, असे सांगून बनावट सोन्याचे मणी खरे असल्याचे भासवत हजारो ते लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या राजस्थानच्या तीघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हे तीघेही आपल्या कबिल्यासह तवलीफाटा येथे रस्त्यालगत राहुट्या ठोकून महिनाभरापासून राहत होते. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मुळ राजस्थानच्या सांचोर, जालोर आणि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले संशयितांनी त्यांच्या साथीदारांसह नाशिक शहर व परिसरात फिरून जे सोने खरेदी करू शकतात, अशा व्यक्तींना हेरून त्यांना बोलीबचन देऊन अस्सल सोन्याचे दोन मणी दाखवून बनावट सोन्याचे मणी असलेल्या मालांचा गुच्छा खोदकामात सापडला असे सांगत विश्वास संपादन करत होते. दुकानदारांसह काही पादचारी माहिला किंवा पुरूषांनाही ते अशाप्रकारे थांबवून गंडविण्याचा प्रयत्न करत होते. बुधवारी (दि.२४) सातपुर एमआयडीसी भागात दुपारच्या सुमारास फिर्यादी मोहित कोतकर यांना अशाप्रकारे २२ग्रॅम वजनाच्या सोन्याची (बनावट) मण्यांची माळ दाखविली. त्यांचा विश्वास संपादन करून २० हजार रूपये घेत एक माळ हाती देत फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोतकर यांना नंतर ही माळ बनावट सोन्याची असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार गंगापुर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितला. सोनवणे यांनी तातडीने याबाबत गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना कळविले. ढमाळ यांनी सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, उपनिरिक्षक चेतन श्रीवंत, विष्णु उगले, रविंद्र बागुल यांचे पथक सज्ज करून घटनास्थळी रवाना केले. अंमलदार आप्पा पानवळ यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींना तवली फाटा परिसरात ओळखले. त्यांनी त्वरित पथकाला माहिती कळविली. पथकाने पाठलाग करून तीघा दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले.

महिनाभरापासून कुटुंब कबिल्यासह वास्तव्य! 

संशयित केशाराम सवाराम (रा.बागरियोका वास, रानीवाडा, जि.सांचार), रमेशकुमार दरगाराम (रा.बागरा.जि.जालोर), बाबुभाई मारवाडी (रा.गांधीनगर) हे तीघे त्यांच्या काही साथीदारांसह संपुर्ण कुटुंबासोबत तवलीफाटा परिसरात रस्त्याच्याकडेला झोपड्या टाकून वास्तव्य करत होते. ते दिवसभर आपल्या काही साथीदारांसोबत शहराच्या वेगवेगळ्या भागात रेकी करत नागरिकांना हेरून त्यांना बनावट सोन्याचे मणी देऊन रक्कम उकळत फसवणूक करत होते. त्यांच्या काही साथीदारांचीही नावे निष्पन्न झाली आहेत.

 ...असा मुद्देमाल जप्त 

तीघा संशयितांकडून १५ ते २० जुने मोबाइल, वेगवेगळे सीमकार्ड, सोन्याच्या मण्यांप्रमाणे भासणाऱ्या बनावट माळा, दुचाकी, वजनकाटा, रोकड, सन १९००मधील चांदीचे जुन्या नाणी, खऱ्या सोन्याचे २मणी असा सुमारे १ लाख ६२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता :

शहरात अशाप्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी निसंकोचपणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक-१७ येथे युनिटचे कार्यालय आहे. या संशयितांनी अशाप्रकारे शहरात आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

Web Title: People who was living in cottage used to hand out duplicate gold beads and wear them in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.