येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:44 AM2018-05-05T01:44:50+5:302018-05-05T01:44:50+5:30

येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला.

People of Yeola City | येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष

येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केलाशेर हे भाई शेर है.. भुजबळही शेर है,

येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. गैरकारभाराच्या आरोपांवरून भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ९ वेळा जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते; मात्र त्यांना यश येत नव्हतं. शुक्रवारी त्यांना जामीन मिळाल्याची वार्ता येवल्यात धडकताच शहर व ग्रामीण भागात समर्थकांनी दिवाळी साजरी केली. जामीन मिळाल्याची बातमी येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. गेली दोन वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आला अशी प्रतिक्रि या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विंचूर चौफुलीवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी करत डीजेच्या तालावर ठेका धरला. भुजबळ यांच्या जल्लोषात सुमारे दोन तास येवला-विंचूर चौफुलीवर रहदारी थांबली होती. शेर हे भाई शेर है.. भुजबळही शेर है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिला कार्यकर्त्यांनीदेखील फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. भरउन्हात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विंचूर चौफुलीवर पेढे वाटले. भुजबळ संपर्क कार्यालयात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, बी.आर. लोंढे, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, अरुण थोरात, संजय बनकर, प्रदीप सोनवणे, दीपक लोणारी, भूषण लाघवे, हरिभाऊ जगताप, मोहन शेलार, नवनाथ काळे, भाऊसाहेब कळसकर, बाळासाहेब गुंड, प्रवीण बनकर, सुनील पैठणकर, विष्णू कºहेकर, मुशरीफ शाह, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कर, दत्ता निकम, प्रवीण पहिलवान, उषाताई शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, भारती येवले, राजश्री पहिलवान, सचिन कळमकर, भागवत सोनवणे, विजय खोकले, भाऊसाहेब कळसकर, रवि जगताप, डॉ. संकेत शिंदे, निसार निंबूवाले, प्रशांत शिंदे, रश्मीताई पालवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गंगादरवाजा परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. पेढे वाटण्यात आले. यावेळी सुभाष गांगुर्डे, बाळासाहेब कापसे, गोटू मांजरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. येवल्याच्या थांबलेला विकास परत एकदा सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया येवल्यात उमटली.

Web Title: People of Yeola City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.