अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधींचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:13 AM2019-07-15T02:13:25+5:302019-07-15T02:13:53+5:30
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराला अधिकारीही बळी पडत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
नाशिक : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराला अधिकारीही बळी पडत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. रखडलेल्या कामांची माहिती, परत गेलेला निधी आणि निधी मंजुरीच्या फाईल्स का अडविल्या जातात, याचा खुलासा यावेळी अधिकाºयांनाही करता आला नाही. यावर पालकमंत्र्यांनी हा गंभीर प्रकार असल्याचे अधोरेखित करीत पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या समस्यांचे वैयक्तिक निराकरण करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.
आमदार पंकज भुजबळ यांनी मतदारसंघातील मक्यावरील लष्कर अळीच्या प्रभावामुळे नुकसान झाल्याने नुकसानभरपाईची मागणी केली, तर जिल्ह्णातील पाऊस मोजताना ज्या तालुक्यांमध्ये पाऊस झालेलाच नाही अशा तालुक्यांनाही त्यात मोजले जात असल्याने दुष्काळी नियोजनात अशा तालुक्यांवर अन्याय होतो याकडे लक्ष वेधले. ग्रामीण रुग्णालये सक्षम केली तर जिल्हा रुग्णालयांवर ताण येणार नाही, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आमदार निर्मला गावित यांनीदेखील इगतपुरीतील रुग्णालयाला सक्षम करण्याची मागणी केली तसेच ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची उपयुक्तताही सांगितली. भावली धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याकडे लक्ष वेधतानाच इगतपुरीतील पावसाचे प्रमाण लक्षात घेता येथील धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी शाळा खोल्यांच्या दुरवस्था आणि शाळा बांधकामाचा मुद्दा मांडला.
आमदार किशोर दराडे यांनी शाळा खोल्यांसाठी निधीची मागणी केली. जिल्ह्णातील ५९ शाळांनी वीजबिल न भरल्याने त्यांची वीज बंद करण्यात आल्याकडेही लक्ष वेधले. या शाळा अंधारात असून, डिजिटल शाळांना जोडणी आहे, परंतु वीज बिलाचा प्रश्न असल्याने शाळांच्या वीज बिलासाठी स्वतंत्र हेडची मागणी नोंदविली.
आमदार दीपिका चव्हाण यांनी मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी या नद्या शासनाने अधिसुचित केल्या आहेत. या नद्यांवर केटीवेअर बांधण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळत नसल्याचे सांगितले. या नद्यांवर एचडीपीई ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिक पेपर वापरून भूमिगत बंधाºयासाठी मान्यता देण्याची मागणी केली. सिमांतिनी कोकाटे, आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांसाठी निधीची मागणी केली. खासदार भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे यांनीही अनेक मुद्दे उपस्थित केले.
नांदगाव, मनमाडला कृत्रिम पावसाची मागणी
जिल्ह्णातील धरणक्षेत्रात आणि शहरी भागात पाऊस होत असला तरी जिल्ह्णातील अजूनही सहा तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर नांदगाव, मनमाड या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी पंकज भुजबळ यांनी केली. मागीलवर्षी असाच प्रयोग करण्यात आला होता, तो यशस्वी होऊ शकला नसला तरी यंदा कृत्रिम पावसाची आवश्यकता निर्माण झाल्याचे सांगितले. आमदार दीपिका चव्हाण यांनीदेखील देवळा, कळवण तालुक्यांमध्ये कृत्रिम पावसाची आवश्यकता व्यक्त केली.
..तर अधिकाºयांवर कारवाई
केंद्र आणि राज्य शासन विकासाच्या अनेक योजना जनतेसाठी लागू करीत असताना अधिकाºयांकडून अशाप्रकारे दिरंगाई होणार असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. शासन गतिमान असताना प्रशासनानेदेखील गतिमान होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनातील अधिकारी काम करीत नसतील आणि जनतेला योजनांना लाभ होणार नसेल तर याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही महाजन म्हणाले.